बाबासाहेबांच्या जयंतीसाठी एकवटली काँग्रेस
By Admin | Updated: April 8, 2016 01:18 IST2016-04-08T01:18:53+5:302016-04-08T01:18:53+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त नागपुरात होणाऱ्या सभेची तयारी.....

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी एकवटली काँग्रेस
११ ला नागपुरात समारोह : कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विचारमंथन
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त नागपुरात होणाऱ्या सभेची तयारी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र बैठक घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारोहानिमित्त ११ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर काँग्रेसने विराट सभेचे आयोजन केले आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत. सभेच्या तयारीसाठी बुधवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. नागपुरातील सभेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जातील, असे बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ. व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. पेंटारामा तलांडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, प्रदेश प्रतिनिधी रवींद्र दरेकर, विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, महासचिव प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा परिषद सदस्य केसरी उसेंडी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, अमोल भडांगे, बालाजी गावडे, नंदू वाईलकर, नितेश राठोड, रजनिकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, पी. आर. आकरे, लतिफ रिजवी, रवींद्र शहा, वैभव भिवापुरे, राजेश ठाकूर, सी. बी. आवळे, पी. टी. मसराम, आरती लहरी, जास्वंदा करंगामी, मंगला कोवे, सुकमा जांगधुर्वे, प्रतिभा जुमनाके, ज्योती गव्हाणे, मंदा तुरे, रेखा मडावी, शांताबाई परसे, प्रमिला कुंभरे, सुनंदा तटकेलवार, कल्पना वड्डे, मुश्ताक हकीम, सलीम शेख, तौफिक शेख, बाशिद शेख, आरिफ कनौज, मदन मडावी, मिलिंद खोब्रागडे, चंदू वडपल्लीवार, नितीन राऊत, दिलीप घोडाम, ओमराज हारगुडे, नरेंद्र गजापुरे, अमिता हिचामी, मंगेश पोरटे, रामचंद्र गोटा, अतुल लटारे, सुरेश वैरागडे, भगवान साखरे, नेताजी गावतुरे, मुखरु नीलेकार, कमलेश सरकार, हरिपद पांडे, अतुल पिपरे, महादेव भोयर, परशुराम बांबोळे, केशव गेडाम, संतोष दशमुखे व काँग्रेसचे कार्यक्रर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सतीश विधाते, तर आभार महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)