भांडणाने केला काँग्रेसचा घात
By Admin | Updated: October 19, 2014 23:37 IST2014-10-19T23:37:24+5:302014-10-19T23:37:24+5:30
२००९ मध्ये आरमोरी व गडचिरोली हे दोन विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या हाती आले. त्यानंतर काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकतही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून

भांडणाने केला काँग्रेसचा घात
गडचिरोली : २००९ मध्ये आरमोरी व गडचिरोली हे दोन विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या हाती आले. त्यानंतर काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकतही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत भाजपसोबत हातमिळवणी केली. काँग्रेसमध्ये जिल्ह्यात तीन ते चार गट हे सुरूवातीपासूनच आहे. या गटांमध्ये मोठे राजकारण चालत आले आहे. एकाला दिले तर दुसरा नाराज, अशी परिस्थिती निर्माण झाली. या वादात लोकसभा निवडणुकीनंतर आणखी भर पडली. २००९ मध्ये ज्या विजय वडेट्टीवार यांच्या भरवशावर काँग्रेसचा खासदार व गडचिरोली विधानसभा क्षेत्रात यश मिळविले. त्या वडेट्टीवार समर्थकानाच दूर सारण्याचे प्रयत्न काँग्रेसमध्ये झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये वातावरण तापलेले होते. या वातावरणात विधानसभा निवडणुकीत सगुना तलांडी यांना उमेदवारी मिळाली व वेळेवर जिल्हाध्यक्ष बदलविण्यात आला. प्रचाराचे नियोजन ढासळले. रसदवरून वादही झालेत. याची परिणीती पराभवात झाली.