शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँंग्रेसचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:36 IST

तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देधान खरेदी केंद्र सुरू करा : कोरची-कुरखेडा मार्ग दोन तास रोखला; व्यवस्थापकांनी दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील शेतकरी यंदा हवालदिल झाले आहेत. अशातच धान कापणीला महिना लोटून सुद्धा कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी अल्पदरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आक्रमक झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्याकरिता उपप्रादेशिक व्यवस्थापक कोरची यांच्याकडून आश्वासन देण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांनी ‘आम्हाला आश्वासन नको तर अमलबजावणी हवी’ अशा घोषणा करून जवळपास दोन तास चक्काजाम आंदोलन सुरू ठेवले. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली व तीनही खरेदी केंद्र सुरु करण्याचे मान्य केले. कोटरा येथे आविका यांच्या माध्यमातून व बोरी व बेडगाव येथे महामंडळातर्फे खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर दोन तास सुरु असलेले चक्काजाम आंदोलन तालुका काँग्रेस कमेटी व शेतकºयांकडून मागे घेण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार बोक्के, कोरची पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी गोरखनाथ दहिफडे, उपपोलीस निरीक्षक महेश कोंडुभैरी उपस्थित होते. चक्काजाम आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष श्यामलाल मडावी, सदरुद्दीन भामानी, मनोज अग्रवाल, कचरीबाई काटेंगे, जगदीश कपूरडेहरिया, प्रमिलाताई काटेंगे, हेमंताबाई शेंडे, धनराज मडावी, हर्षलता भैसारे, राहुल अंबादे, रुकमन घाटघूमर, वसीम शेख, उद्धव कोरेटी, तुलाराम मडावी, लहानू सहारे, कांताराम जमकातन, तुळशीराम बावनथडे, मोहन कुमरे, रामू नैताम, धरमसाय कोवाची, मानसिंग नैताम, जगदीश काटेंगे, तुलाराम मडावी, रामचंद्र मेश्राम, मदन कोल्हे, घनश्याम फुलकुवर, रवी नंदेश्वर, सुंदर दर्रो, शांताराम बोगा, निर्मल पुळो, रामदास घावडे व बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनादरम्यान कोरची पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसChakka jamचक्काजाम