काँग्र्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित दीपक आत्राम होणार काँगे्रसवासी
By Admin | Updated: September 9, 2015 01:34 IST2015-09-09T01:34:04+5:302015-09-09T01:34:04+5:30
आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार आहे.

काँग्र्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित दीपक आत्राम होणार काँगे्रसवासी
आलापल्लीत होणार मेळावा : आविस कार्यकर्त्यांशी चर्चा
एटापल्ली : आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आलापल्ली येथे मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे, अशी माहिती एटापल्ली येथे विश्रामगृहात आयोजित कार्यकर्ता बैठकीसाठी आले असताना त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नामदेव उसेंडी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली. सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यात आलापल्ली येथे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतला जाईल व नगर पंचायत निवडणुकीपूर्वी हा प्रवेश होईल, अशी माहिती त्यांनी दिली. अहेरी उपविभागातील सर्व नगर पंचायती काँग्रेस पक्ष लढवेल, असेही यावेळी म्हणाले.
एटापल्ली येथे मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामभवनात आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार दीपक आत्राम यांनी घेतली. यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली व आपला काँग्रेस प्रवेश निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशाने या भागात पक्षाला नवसंजीवनी मिळाण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व एटापल्ली पं.स.चे उपसभापती संजय चरडुके यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगर पंचायतीच्या सर्व जागा काँग्रेस पक्ष लढविणार असल्याचे लोकमतला सांगितले.