आई-वडिलांशी भांडण; युवतीने प्राशन केले कीटकनाशक, उपचारादरम्यान मृत्यू 

By गेापाल लाजुरकर | Updated: December 9, 2024 20:30 IST2024-12-09T20:30:18+5:302024-12-09T20:30:37+5:30

करुणा पोचमलू निर्ला (२०) रा. कमलापूर, असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

Conflict with parents; Young woman ingested insecticide, died during treatment, Gadchiroli  | आई-वडिलांशी भांडण; युवतीने प्राशन केले कीटकनाशक, उपचारादरम्यान मृत्यू 

आई-वडिलांशी भांडण; युवतीने प्राशन केले कीटकनाशक, उपचारादरम्यान मृत्यू 

गडचिरोली : युवती व आई-वडिलांमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले. तेव्हा आईने मीच विष पिऊन मरते, अशी धमकी मुलीला दिली. याचवेळी रागाच्या भरात मुलीने कीटकनाशक प्राशन केले. ह्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे रविवार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. 

करुणा पोचमलू निर्ला (२०) रा. कमलापूर, असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. कमलापूर येथील निर्ला कुटुंबात करुणा हिचे आई-वडिलांशी भांडण झाले. भांडण अधिकच विकोपाला गेले. तेव्हा आईने मीच विष प्राशन करून मरते, अशी धमकी मुलीला दिली. आईने बोलल्याचे शब्द मुलीच्या मनाला बोचले. नंतर तिने रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन केले. 

शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी पावसाळ्यात हे कीटकनाशक आणलेले होते. यापैकी काही शिल्लक होते. मुलीने विष प्याल्याची बाब काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले; परंतु येथे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. 

येथील रुग्णवाहिकासुद्धा दुरुस्तीसाठी गडचिरोली येथे पाठविली होती. तेव्हा प्रभारी वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर यांच्याशी काही लोकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहन उपलब्ध करून दिले. ताेपर्यंत बराच उशीर झाला. करुणाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

‘पीएचसी’मध्ये उपचार झाला असता तर वाचला असता जीव
कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. एकातरी वैद्यकीय अधिकाऱ्याने २४ तास उपलब्ध असावे, असा नियम आहे; परंतु रविवारी दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे करुणावर वेळीच उपचार झाला नाही. वेळेवर उपचार झाला असता तर करुणाचा जीव वाचला असता, असा आरोप करीत सरपंच श्रीनिवास पेंदाम यांनी डॉक्टरांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे.

Web Title: Conflict with parents; Young woman ingested insecticide, died during treatment, Gadchiroli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.