५०% सवलतीच्या बियाण्यांवर संक्रांत

By Admin | Updated: June 28, 2015 02:16 IST2015-06-28T02:16:03+5:302015-06-28T02:16:03+5:30

जिल्हा परिषदेच्या १३ वने, सात टक्के वन महसूल अनुदान योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीवर...

Concentrate on 50% discounted seeds | ५०% सवलतीच्या बियाण्यांवर संक्रांत

५०% सवलतीच्या बियाण्यांवर संक्रांत

साडेतीन हजारांची मागणी : १ हजार २९२ क्विंटल प्राप्त
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या १३ वने, सात टक्के वन महसूल अनुदान योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीवर ३ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याची बाराही पंचायत समिती स्तरावरून मागणी होती. मात्र जि.प. कृषी विभागाकडे अत्यल्प निधी असल्याच्या कारणावरून कृषी विभागाने केवळ १ हजार २९२ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. सवलतीवर अत्यल्प प्रमाणात बियाणे उपलब्ध झाल्याने अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना पूर्ण पैसे भरून महागडे बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करावे लागणार आहे.
१३ वने ७ टक्के वन महसूल अनुदान योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ या वर्षीच्या अंदाजपत्रकात बियाणे खरेदीसाठी २० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यात १५ लाख रूपयांतून खरीप हंगामातील बियाणे तर पाच लाख रूपयांतून रबी हंगामातील बियाणे सवलतीत पुरविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले. यानुसार जि.प.ने १५ लाख रूपयांतून खरीप हंगामासाठी धान, तूर व सोयाबिन आदी पिकांचे एकूण १ हजार २९२ क्विंटल बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.
जि.प.च्या कृषी विभागाने ५० टक्के सवलतीवर धान पिकाची एकूण ७९८ बियाणे उपलब्ध केले आहे. यामध्ये गडचिरोली पंचायत समितीला ८१ क्विंटल, आरमोरी ८९, देसाईगंज ४३, कुरखेडा ७१, कोरची ५७, धानोरा ८६, चामोर्शी १३०, मुलचेरा ३५, अहेरी ५४, एटापल्ली ७२, भामरागड ४२ व सिरोंचा पंचायत समितीला ३८ क्विंटल धान बियाणे उपलब्ध करून दिले आहे. सदर बियाणे खरेदीसाठी जिल्हा परिषदेने १४ लाख ९९ हजार ५०० रूपयांचा निधी खर्च केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना असे मिळणार अनुदान
जि.प.च्या १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदान योजनेतून ५० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्रीराम जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल २ हजार ५०० रूपये, एमटीयू १०१० जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल १ हजार ५०० रूपये, एमटीयू १००१ जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल १ हजार ५००, आयआर ६४, जेजीएल १७९८, पीकेव्ही एचएमटी, सुवर्णा जातीच्या धान बियाण्यांवर प्रती क्विंटल १ हजार ५०० रूपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. डीआरके जातीच्या धान बियाण्यावर प्रती क्विंटल २ हजार ५०० रूपय व सह्यांद्री धान बियाण्यावर प्रती क्विंटल पाच हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. तूर बियाण्यावर प्रती क्विंटल ३ हजार ५०० व सोयाबिन बियाण्यांवर प्रती क्विंटल २ हजार ५०० रूपये शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

Web Title: Concentrate on 50% discounted seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.