शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

संगणक शिक्षक झाले बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:19 PM

राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आयसीटी (इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी) हा विषय शिकविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने २००८ पासून आयसीटी योजना सुरू केली.

ठळक मुद्देशासनाने आयसीटी योजना गुंडाळली : कंपन्यांशी असलेला करारनामा संपुष्टात

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आयसीटी (इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी) हा विषय शिकविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने २००८ पासून आयसीटी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विविध कंपन्यांशी करार करून राज्यभरातील शाळांमध्ये तब्बल आठ हजार संगणक शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली. दरवर्षी संबंधित कंपन्यांकडून सदर शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती केली जाते, पण आता १५ वर्षांच्या सेवेनंतर शासनाने नवीन वर्षासाठी आयसीटी योजना चालविणाऱ्या कंपन्यांशी करारच केला नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ७३ शिक्षकांसह राज्यभरातील आठ हजार शिक्षकांवर १५ डिसेंबरपासून बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर व संगणकाचे ज्ञान देण्यासाठी शासनाने २००८ मध्ये आयसीटी योजना सुरू केली होती. शासनाने संगणक शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे या मागणीसाठी आयटी शिक्षक संघटनेमार्फत अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चाही काढला होता. त्यावेळी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी संगणक शिक्षकांना बेरोजगार होऊ देणार नाही, त्यांना सेवेत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. मात्र त्यानंतर शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही.आता कंपन्यांशी केलेला शासनाचा करार संपल्याने या संगणक शिक्षकांची सेवा संपुष्टात आली आहे. १५ डिसेंबरपासून ‘काम नाही, तर वेतन नाही’ अशा समस्येत राज्यभरातील संगणक शिक्षक सापडले आहेत. आयसीटी योजनेअंतर्गत २०१३ पासून संगणक शिक्षणाचा तिसरा टप्पा सुरू होता. या तीनही टप्प्यात नियुक्त झालेले शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत होते. परंतू आता कंपन्यांशी असलेला पाच वर्षांचा तिसºया टप्प्याचा करार संपुष्टात आल्याने सर्व आयसीटी शिक्षक बेरोजगार झाले आहेत.मुंबईत आंदोलनाचा इशाराआयसीटी योजनेअंतर्गत आतापर्यंत कार्यरत असलेल्या संगणक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन सदर संगणक शिक्षकांना आपल्या कार्यालयामार्फत मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परंतू त्याबाबत अद्याप त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. १५ वर्षाच्या सेवेनंतर शासनाने घेतलेल्या भूमिकेविरूद्ध न्याय मागण्यासाठी येत्या २ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा आयसीटी शिक्षक संघटनेने दिला असल्याचे राजेंद्र मुनघाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षक