लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संगणक परिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील सुमारे २३ हजार संगणक परिचालकांनी मुंबई येथील विधीमंडळावर धडक दिली. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो संगणक चालक या आंदोलनात सहभागी झाले होते.राज्यातील ग्रामीण जनतेला रहिवासी, बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल यासह सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतीच्या संपूर्ण जमा खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभा यांचे आॅनलाईन कामकाज, १४ व्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे यांच्यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करतो. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी, अस्मिता योजना, जनगणना, घरकुलांचा सर्वे, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी अनेक प्रकारची कामे संगणक परिचालक मागील सात वर्षांपासून करीत आहे. मात्र संगणक परिचालकांना वर्ष उलटूनही मानधन मिळत नाही. नियमित मानधन देण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानुसार नियमित मानधन मिळत नाही. संगणक परिचालकांना नियमित मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो चालकांनी सहभाग घेतला.
संगणक परिचालकांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:56 IST
संगणक परिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील सुमारे २३ हजार संगणक परिचालकांनी मुंबई येथील विधीमंडळावर धडक दिली. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो संगणक चालक या आंदोलनात सहभागी झाले होते.
संगणक परिचालकांची धडक
ठळक मुद्देविधिमंडळावर मोर्चा : आयटी विभागाकडून नियुक्ती देण्याची मागणी