यात्रेकरूंसाठी सुविधांची तयारी पूर्ण
By Admin | Updated: March 6, 2016 01:09 IST2016-03-06T01:09:40+5:302016-03-06T01:09:40+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेच्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त भाविकांसाठी सर्व सोयीसुविधाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

यात्रेकरूंसाठी सुविधांची तयारी पूर्ण
पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा : मार्कंडा देवस्थान ट्रस्टची माहिती
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेच्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त भाविकांसाठी सर्व सोयीसुविधाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पूजा हस्ते होणार आहे, अशी माहिती मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मार्कंडादेव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
मार्र्कंडादेव येथे भरणाऱ्या १० ते १५ दिवसांच्या यात्रेनिमित्त ७ मार्च रोजी पहाटे ४ वाजता प्रारंभी महापूजा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, पूजेचे जोडपे पंकज पांडे व शुभांगी पांडे यांच्या हस्ते होणार आहे. ८ मार्चला मारोती म्हशाखेत्री, ९ ला दुपारी ४ वाजता लक्ष्मण काळे महाराज यांचे प्रवचन जगन्नाथबाबा मठाच्या आवारात होणार आहे. १० ला समारोपीय महापूजा व पालखीचे पूजन जि. प. बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते होईल. देवस्थान ट्रस्टतर्फे संपूर्ण दिवस महाप्रसाद, पिण्याचे पाणी, कापडी मंडप, भक्तनिवास, सूचना फलक, ध्वनीक्षेपक सूचना फलक लावण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्युंजय गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, तहसीलदार यू. जी. वैद्य, रामप्रसाद मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गजानन कोंडूकवार, सचिव केशव आंबटकर, उपाध्यक्ष किसनराव गिरडकर, आबाजी धोडरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)