गटारलाईनचे काम वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:46+5:30

लॉकडाऊनमुळे या भागात भूमिगत गटार लाईनचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. गटारलाईनसाठी खोदकाम केलेल्या रस्त्याची डागडुजी न केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र चिखलमय स्थिती पाहावयास मिळते.

Complete the gutterline work on time | गटारलाईनचे काम वेळेत पूर्ण करा

गटारलाईनचे काम वेळेत पूर्ण करा

ठळक मुद्देरामनगरवासीयांची मागणी : रस्ते चिखलमय झाल्याने आवागमनास त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रामनगर प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगर परिषदेच्या वतीने भूमिगत गटार लाईनचे काम सुरू आहे. परंतु सदर काम संथगतीने सुरू असल्याने वॉर्डातील नागरिकांना चिखलमय रस्त्याने आवागमन करावे लागत आहे. सदर गटार योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी वॉर्डवासीयांनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे या भागात भूमिगत गटार लाईनचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. गटारलाईनसाठी खोदकाम केलेल्या रस्त्याची डागडुजी न केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र चिखलमय स्थिती पाहावयास मिळते. स्थानिक प्रशासनाच्या वतीने १ वर्षापूर्वी भूमिगत गटार लाईनचे काम शहरातील सर्वच वॉर्डात सुरू करून रस्त्याच्या मधोमध खोदकाम करुन पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र त्या रस्त्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष झाले. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर चिखल निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने आवागमन करताना त्रास होत आहे. रस्त्याच्या मधोमध केलेल्या खोदकामामुळे या ठिकाणी किरकोळ अपघातही घडले आहेत.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही रस्त्याच्या डागडुजीचे काम झाले नाही. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याची लवकर डागडुजी करावी तसेच गटारलाईनचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे, अशी मागणी नगरसेविका अनिता विश्रोजवार यांनी केली आहे. पावसाळ्यात वॉर्ड परिसरात गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गटारलाईनचे काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Complete the gutterline work on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.