रखडलेल्या विहिरींचे बांधकाम तत्काळ पूर्ण करा
By Admin | Updated: November 5, 2015 01:53 IST2015-11-05T01:53:24+5:302015-11-05T01:53:24+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या

रखडलेल्या विहिरींचे बांधकाम तत्काळ पूर्ण करा
चामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे अद्यापही बांधकाम पूर्ण झाले नाही. २ फेब्रुवारी २०१६ पर्यंत शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण करावे, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती चामोर्शी येथील सांस्कृतिक सभागृहात सिंचन विहिरी लाभार्थ्यांची कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी संपदा मेहता बोलत होत्या.
कार्यशाळेचे उद्घाटन सीईओ संपदा मेहता यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती शशिकला चिळंगे होत्या. यावेळी पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे, मार्गदर्शक म्हणून कार्यकारी अभियंता गडघाटे, जि. प. नरेगाचे गटविकास अधिकारी शालिकराम पडघन, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. आर. मुद्दमवार, उपविभागीय अभियंता दुमपट्टीवार, विस्तार अधिकारी भोजे उपस्थित होते. कार्यशाळेत शेतकऱ्यांनी विहीर बांधकामात येणाऱ्या अनेक समस्या व अडचणी मांडल्या. सीईओ मेहता यांनी अनेक उपाययोजना सूचवित समस्यांवर चर्चा केली. कार्यशाळेचे संचालन कनिष्ठ सहाय्यक स्वप्नील पुसके तर आभार विस्तार अधिकारी भोजे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)