शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अ‍ॅपवर करता येणार अस्वच्छतेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 11:15 PM

शहरातील कचरा, दुर्गंधी याबाबतची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता (२६ंूँँं३ं) अ‍ॅप तयार करण्यात आले असून या अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना घरबसल्या नगर परिषदेकडे तक्रार करता येणार आहे.

ठळक मुद्देगडचिरोली न.प.चा उपक्रम : शहरवासीयांसाठी सुविधा; स्मार्ट फोनमधून डाऊनलोड करता येणार अ‍ॅप

दिगांबर जवादे।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : शहरातील कचरा, दुर्गंधी याबाबतची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता (२६ंूँँं३ं) अ‍ॅप तयार करण्यात आले असून या अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना घरबसल्या नगर परिषदेकडे तक्रार करता येणार आहे. सदर स्वच्छता अ‍ॅप स्मार्ट फोनमधील प्ले-स्टोअरमधूून डाऊनलोड करता येते. आजपर्यंत ४४५ शहरातील नागरिकांनी सदर अ‍ॅप डाऊनलोड केले असून या अ‍ॅपच्या मदतीने ते नगर परिषदेकडे तक्रारी करीत आहेत.दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत चालला आहे. त्याचबरोबर कचरा व दुर्गंधीची समस्या गंभीर होत आहे. बऱ्यांचवेळा काही भागात स्वच्छता कर्मचारी पोहोचत नाही. याबाबतची तक्रार नागरिक संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकाकडे किंवा नगर परिषदेच्या फोनवर करतात. मात्र बºयाचवेळा या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची अधिकृत नोंदसुद्धा राहत नाही. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने स्वच्छता अ‍ॅप तयार केला आहे. सदर अ‍ॅप कोणत्याही स्मार्टफोनमधील प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर त्या अ‍ॅपच्या मदतीने दुर्गंधी किंवा कचºयाचा फोटो काढून सदर फोटो अ‍ॅपमध्ये अपलोड करता येते. अपलोड झालेला फोटो सदर अ‍ॅपचे नियंत्रण करणाऱ्या नगर परिषदेच्या टीमला उपलब्ध होते. सदर अ‍ॅप जीपीएस स्टिस्टीमसोबत कनेक्ट असल्याने ज्या ठिकाणावरचा फोटो आहे, त्याचा ठिकाण आपोआप जनरेट करते किंवा काहीवेळेला स्वत: ठिकाण टाकावा लागतो. तक्रारीचा फोटो मॉनिटर करणाऱ्या टीमला उपलब्ध झाल्यानंतर मॉॅनिटर करणारी टीम त्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देते किंवा नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून सदर तक्रारीचे निराकरण केले जाते. मॉनिटर करणाºया टीममध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने आहेत. त्यामुळे या अ‍ॅपवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर त्यांची नजर राहते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात सदर तक्रारीचे निवारण झाले आहे काय याचा आढावा घेतला जातो. त्यामुळे अ‍ॅपच्या मदतीने केलेल्या तक्रारीचे निवारण तत्काळ होण्यास मदत होते. अ‍ॅपचा परिणामकारक उपयोग झाल्यास गडचिरोली शहरातील कचरा व दुर्गंधीची समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.अशा पद्धतीने होते अ‍ॅप डाऊनलोडस्मार्टफोनमधील प्लेस्टोअरमध्ये जाऊन स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करा. भाषा निवडून स्वत:चा मोबाईल नंबर टाकावा लागतोे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच मोबाईल नंबरवर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. सदर पासवर्ड विचारलेल्या ठिकाणी टाकावा लागतो. बहुतांशवेळा ओटीपी आपोआप सदर अ‍ॅप स्वीकारतो. त्यानंतर कंन्टिन्यूवर क्लिंक केल्यानंतर स्वच्छता अ‍ॅप ओपन होतो. त्यानंतर त्याचा वापर करता येतो.अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर पोस्ट युअर कम्प्लेंट हा आॅप्शन येतो. त्यानंतर टेक पिक्चर किंवा गॅलरी हे दोन आॅप्शन दाखविले जातात. टेक पिक्चरवर क्लिक केल्यानंतर कॅमेरा सुरू होतो. कॅमेराने काढलेल्या फोटोच्या खाली राईट असा सांकेतिक चिन्ह येतो. त्यानंतर सदर तक्रार कोणत्या प्रकारची आहे, त्यावर सिलेक्ट केल्यानंतर अ‍ॅड लॅन्डमार्कमध्ये ठिकाण विचारते. त्याच्या खाली गोल आकाराचे जीपीएस स्टिस्टीमचा चिन्ह राहते. त्यावर क्लिक केल्यानंतर आपोआप आपला स्थळ जीपीएस स्टिस्टीमद्वारे स्ट्रेस केला जातो. मात्र नेमके ठिकाण दर्शविण्यासाठी अ‍ॅड लॅन्डमार्कमध्ये ठिकाणाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर फोटो पोस्ट केल्यानंतर तो मॉनिटर करणाºया स्टिस्टीमला उपलब्ध होते व त्यानंतर तक्रारीचे निवारण केल्या जाते.स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर स्वत: टाकलेल्या तक्रारीबरोबरच इतरांनीही टाकलेल्या तक्रारी बघायला मिळतात. काही नागरिक मात्र या अ‍ॅपचा दुरूपयोग करीत असल्याचे दिसून येते. एखादा कागद किंवा अगदी थोडा कचरा असला तरी त्याचा फोटो काढून अ‍ॅपमध्ये टाकला जात आहे. यामुळे महत्त्वाची तक्रार दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे.याबाबत करता येते तक्रारमृत जनावर, डस्टबिन साफ नसणे, कचरा साचलेला असणे, कचरा उचलणारे वाहन पुष्कळ दिवसांपासून आले नाही, परिसर झाडण्यात आला नाही, सार्वजनिक शौचालयांमध्ये विद्युत किंवा पाणी नाही, सार्वजनिक शौचालय ब्लॉक झाला असणे याबाबतच्या तक्रारी करता येतात. स्वच्छता अ‍ॅपमध्ये फोटो काढल्यानंतर नागरिकाची कोणत्या प्रकारची तक्रार आहे, त्यानुसार सदर पर्याय निवडावा लागतो.सात जणांची टीम कार्यरतअ‍ॅपचे मॉनिटरिंग करण्याबरोबरच प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सात जणांची टीम नगर परिषदेने नियुक्त केली आहे. यामध्ये मुख्याधिकारी कृष्णा निपाने, अल्केश बन्सोड, नूतन कोरडे, प्रशांत चिचघरे, अमोल कामडे, नितीन गौरखेडे व दीपक चौधरी यांचा समावेश आहे.कचरा व दुर्गंधीबाबतच्या तक्रारीसाठी सदर अ‍ॅप नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सदर अ‍ॅप डाऊनलोड करून तक्रार करणे अतिशय सोपे आहे. आजपर्यंत गडचिरोली शहरातील सुमारे ४४५ नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. इतरही नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करून नगर परिषदेच्या या सुविधेचा लाभ घ्यावा.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी,नगर परिषद, गडचिरोली