दारू बंद करण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार

By Admin | Updated: January 28, 2016 01:17 IST2016-01-28T01:17:11+5:302016-01-28T01:17:11+5:30

गावात सट्टा, दारू, जुगार या अवैध धंद्यांची दिवसेंदिवस वाढ होत असून शालेय विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांपर्यंत या वाईट सवयींच्या आहारी जात आहे.

Complain to the superiors to stop alcohol | दारू बंद करण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार

दारू बंद करण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार


वैरागड : गावात सट्टा, दारू, जुगार या अवैध धंद्यांची दिवसेंदिवस वाढ होत असून शालेय विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांपर्यंत या वाईट सवयींच्या आहारी जात आहे. गावातील काही बड्या दारूविक्रेत्यांना पोलिसांचा अभय आहे, असा थेट आरोप ग्रामसभेत उपस्थित महिलांनी केला.
वैरागड येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी गावातील काही युवकांनी लेखी निवेदन ग्रामसभेत दिले होते. वैरागड गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विकल्या जाते. येथूनच जिल्ह्याच्या विविध भागातही दारूचा पुरवठा होतो, अशी माहिती ग्रामस्थांनी दिल्यावर ग्रामसभेत चांगलाच गदारोळ झाला. २६ जानेवारी रोजी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत अनुसूचित जमातीच्या घरकूल लाभार्थ्यांची निवड स्वस्त धान्य दुकान १ हे हस्तांतरण व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत नियोजित काम, वैरागड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पाटणवाडा येथील पेसांतर्गत कामाचे नियोजन या विषयावर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी भास्कर बोडणे होते.

Web Title: Complain to the superiors to stop alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.