समाजाच्या नॉन क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख करणार

By Admin | Updated: January 11, 2016 01:21 IST2016-01-11T01:21:15+5:302016-01-11T01:21:15+5:30

बेलदार समाजाच्या नॉन क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाखांपर्यंत करणार तसेच समाजभवनाच्या संरक्षण भिंतीसाठी निधीही देणार, ....

The community's non-criminality limit is six lakh | समाजाच्या नॉन क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख करणार

समाजाच्या नॉन क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख करणार

पालकमंत्र्यांचे आश्वासन : संरक्षण भिंतीसाठी निधी देणार
अहेरी : बेलदार समाजाच्या नॉन क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाखांपर्यंत करणार तसेच समाजभवनाच्या संरक्षण भिंतीसाठी निधीही देणार, असे आश्वासन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.
अहेरी येथे बेलदार समाजाच्या वतीने समाज भवनाच्या प्रांगणात रविवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या ११६ व्या जयंती कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारय्या बेझनवार होते. प्रमुख अतिथी म्हणून किष्टय्या उप्पलवार, भानय्या देबेडवार, अरूण बेझलवार आदी उपस्थित होते. यावेळी स्व. बबनराव पेदापल्लीवार यांच्या स्मृतीपित्यर्थ पुष्पा पेदापल्लीवार यांच्या तर्फे समाजभवन परिसरात हातपंप देण्यात आले. या हातपंप कामाचे भूमिपूजन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल मुक्कावार यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन महेश मुक्कावार यांनी केले. यशस्वीतेसाठी श्रीकांत नामनवार, अमिल बेझलवार, सतिश तोटावार, समीर पेडपल्लीवार, चंदू सुंकरी, अक्षय येन्नामवार, महेश मेकर्तीवार, रूपेश जाकेवार, अनुराग बेझलवार, गोलू कोडेलवार यांनी सहकार्य केले.

Web Title: The community's non-criminality limit is six lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.