दीक्षाभूमी विकासासाठी कटिबद्ध
By Admin | Updated: November 14, 2016 02:05 IST2016-11-14T02:05:43+5:302016-11-14T02:05:43+5:30
देसाईगंज येथील दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण

दीक्षाभूमी विकासासाठी कटिबद्ध
सामाजिक न्यायमंत्र्यांची ग्वाही : देसाईगंज येथे जनसंवाद मेळावा; भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
देसाईगंज : देसाईगंज येथील दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार कटिबद्ध असून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
देसाईगंज येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा. अनिल सोले, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रकाश पोरेड्डीवार, न.पं. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पंचायत समिती सभापती प्रिती शंभरकर, न.प. सभापती शालू दंडवते, तालुका अध्यक्ष राजेश जेठाणी, आकाश अग्रवाल, चांगदेव फाये, रवी गोटेफोडे, आशा राऊत, बबलू हुसैनी, संतोष शामदासानी, सतपाल नागदेवे, नरेश विठ्ठलानी, ज्योतू तेलतुंबडे, सचिन खरकाटे, अण्णाजी तुपट, नंदू नाकतोडे, पंकज खरवडे, करूणा गणवीर, तेजराम हरडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना ना. राजकुमार बडोले म्हणाले की, इंदूमिलच्या साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण, परदेशात राहून ज्या घरात शिक्षण घेतले, त्या लडंन येथील घराचे लिलाव होऊ न देता भाजपप्रणित सरकारने पुढाकार घेऊन विकत घेतले. अनुसूचित जाती व जमातींच्या विकासाचे आपण राजकारण करणार नाही. तर त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभे राहू, असे मार्गदर्शन केले. देसाईगंज येथील दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे हे श्रध्दास्थान आहे. यापूर्वीच्या सरकारचे या पावनभूमीकडे दुर्लक्ष झाले. मात्र भाजपा सरकार या स्थळाचा विकास करेल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
मागील निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या करूणा संजय गणवीर या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत व्यासपीठावर होत्या. त्यामुळे त्या भाजपवासी होऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)