सीईओंच्या सूचनेनंतर जांभळीत कामांची सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:48+5:302021-01-15T04:30:48+5:30

कोरची : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ३१ डिसेंबरला जांभळी गावाला भेट दिली असता, गावात अनेक ...

Commencement of work in purple following the instructions of the CEO | सीईओंच्या सूचनेनंतर जांभळीत कामांची सुरूवात

सीईओंच्या सूचनेनंतर जांभळीत कामांची सुरूवात

कोरची : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ३१ डिसेंबरला जांभळी गावाला भेट दिली असता, गावात अनेक साेयीसुविधांचा अभाव तसेच विविध विकास कामे रखडलेली आढळून आली. नागरिकांनी गावातील विविध समस्या मांडून लक्ष वेधले हाेते. नागरिकांची ही अडचण जाणून सीईओ आशीर्वाद यांनी समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार गावातील रखडलेल्या कामांना सुरूवात झाली आहे.

जांभळी येथे नालीतील गाळाचा उपसा करणे, उतार काढणे, अंगणवाडीजवळ पाईप टाकणे आदी कामांसाठी अंगणवाडी परिसरात परसबागेकरिता माती टाकण्यात आली. अंगणवाडी जवळ शोषखड्डा तयार करण्यात आला. त्याचप्रमाणे अंगणवाडीतील मुला-मुलींची उंची मोजण्याकरिता पट्टी खरेदी करण्यात आली. वजन काटा खरेदी करण्यात आला, जिल्हा परिषद शाळा परिसरात शोषखड्डा तयार करण्यात आला. ०.३ एचपीची इलेक्ट्रिक मोटार खरेदी करून विहिरीत बसविण्यात आली. विहिरीची साफसफाई करून पाणी उपसण्यात आला. गावाकरिता नवीन वाढीव पाईपलाईन टाकण्यात आली तसेच सोलर पंप दुरुस्त करण्यात आले. सार्वजनिक विहिरी दुरुस्त करण्यात आल्या. नालीवर झाकण टाकणे व प्रत्येक घरामध्ये शोषखड्डे तयार करणे, जांभळी, खुणारा व भुऱ्यालदंड येथील मामा तलावाचे खोलीकरण करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.

बाॅक्स ....

वैयक्तिक याेजनांचा लाभ मिळणार

वनविभागांतर्गत नरेगाची कामे घेणे, स्वच्छतागृह बांधकाम करणे, नरेगातून गुरांचे गोठे बांधकाम करणे ही कामे २०२१-२०२२ या वर्षाच्या नियोजनात घेण्यात आलेली आहेत. गावातील बिरसू अमरसिंग कमरो व जगदेव टेहरू बोगा यांची विहीर दुरुस्ती प्रस्ताव बिरसा मुंडा सिंचन विहीर योजने अंतर्गत ऑनलाईन करण्यात आले. ग्रामपंचायत जांभळी अंतर्गत विकासकामे पूर्ण करण्यात आलेली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याचे गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी सांगितले.

Web Title: Commencement of work in purple following the instructions of the CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.