जिल्ह्यात महाविद्यालय कडकडीत बंद
By Admin | Updated: October 6, 2015 01:49 IST2015-10-06T01:49:24+5:302015-10-06T01:49:24+5:30
पुणे येथील एफटीआयआय या संस्थेच्या संचालक पदावर सूचना व प्रसारण मंत्रालयाने गजेंद्र चव्हाण यांची नेमणूक

जिल्ह्यात महाविद्यालय कडकडीत बंद
गडचिरोली : पुणे येथील एफटीआयआय या संस्थेच्या संचालक पदावर सूचना व प्रसारण मंत्रालयाने गजेंद्र चव्हाण यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या नेमणुकीच्या विरोधात विद्यार्थी संघटनेतर्फे मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे केंद्रीय उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे पाठींबा जाहीर केला होता. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोमवारी गडचिरोलीसह राज्यभर युवक काँग्रेस एनएसयुआयतर्फे महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. युवक काँग्रेसचे गडचिरोली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निलेश राठोड, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, जीवन कुत्तरमारे, नितेश बाळेकरमकर, तौफिक शेख, बाळू मडावी, वृषभ धुर्वे, प्रतिक बारसिंगे, अमर नवघडे, नशिकेत जंबेवार, तुषार कुळमेथे, राकेश गरपल्लीवार, राकेश गणवीर, विवेक धोंगडे, अभिजीत धाईत, वृषभ खैरे, बाबू पठाण, निखील खोब्रागडे, अर्पित मेश्राम, संदीप बोरकुटे, सौरभ म्हशाखेत्री, आदित्य नमुलवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गडचिरोली शहरात शाळा महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. धानोरा येथे मिलिंद किरंगे, कुलदिप इंदुरकर, इरफान पठाण, भूषण भैसारे, लोकेश राऊत, रमेश सयाम आदींनी तेथील महाविद्यालय बंद पाडले. त्यामुळे कै. जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य महाविद्यालय सोमवारी बंद होते. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. मंगेश पोरटे यांच्या नेतृत्वात अमन पाल, सुरज बोरकर, सचिन शिंगाडे, पंकज कुकुडकर, वैभव बोरकर, सुरज मेडपल्लीवार, प्रशिल खैरकर, सुरज डांगे, अंकुश खैरकर आदी कार्यकर्त्यांनी बंदसाठी सहकार्य केले. चामोर्शीसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात महाविद्यालय कडकडीत बंद ठेवण्यात आले. हे आंदोलन जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे यशस्वी झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)