वनकर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST2021-08-27T04:40:16+5:302021-08-27T04:40:16+5:30
उपवनसंरक्षक पांडे हे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आणि विशेषत: महिलांना अपमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे लेखापाल जयश्री ...

वनकर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
उपवनसंरक्षक पांडे हे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आणि विशेषत: महिलांना अपमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे लेखापाल जयश्री नालमवार यांनी सेवानिवृत्ती घेतली. या व्यतिरिक्त या कार्यालयात आणखी ३ महिला लिपिकवर्गीय कर्मचारी असून नालमवार यांच्या राजीनाम्यापासून महिला कर्मचारी तणावात आहेत.
(बॉक्स)
महिला कर्मचाऱ्याला रात्रीची ड्युटी?
नाईक या पदावर एक महिला शिपाई कार्यरत आहे. पुरुषांनी दिवसा ड्युटी करायची आणि रात्री स्त्रियांनी ड्युटी करायची असे मौखिक आदेश त्यांना दिले असल्याचाही आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन ते तीन महिन्यांपासून अनुदान उपलब्ध असतानाही प्रलंबीत ठेवले आहे. इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावताना स्वतःच्या दालनातील मात्र काढून टाकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
260821\1932-img-20210826-wa0048.jpg
आज भामरागड उप वनसंरक्षक कार्यालयातील सर्वं कर्मचारी होते सामूहिक रजेवर