गुणवंतांनी प्रशासकीय सेवेत जावे
By Admin | Updated: July 6, 2015 01:53 IST2015-07-06T01:53:32+5:302015-07-06T01:53:32+5:30
जिल्ह्यात तेली समाजात प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. तेली समाजात गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत.

गुणवंतांनी प्रशासकीय सेवेत जावे
अशोक नेते यांचे आवाहन : तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गडचिरोली : जिल्ह्यात तेली समाजात प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. तेली समाजात गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाऊन मोठे अधिकारी बनावे, जेणेकरून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात योगदान लाभेल, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
संताजी सोशल मंडळ गडचिरोलीद्वारा रविवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड, प्राचार्य डॉ. सुरेश रेवतकर, संताजी सोशल क्लबचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, सचिव राजेंद्र भरडकर, कोषाध्यक्ष राजेंद्र इटनकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी व पदवीच्या परीक्षेतील तेली समाजातील ४६ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी मार्गदर्शन केले. संचालन रामराज करकाडे, प्रास्ताविक प्रा. देवानंद कामडी यांनी केले.