सहकार पॅनलची विजयी रॅली

By Admin | Updated: May 19, 2016 01:29 IST2016-05-19T01:29:42+5:302016-05-19T01:29:42+5:30

जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. भंडारा र.नं.११५ ची संचालक मंडळाची निवडणूक झाली. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, ...

Co-operation Panel's Victory Rally | सहकार पॅनलची विजयी रॅली

सहकार पॅनलची विजयी रॅली

सोनपुरी : जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. भंडारा र.नं.११५ ची संचालक मंडळाची निवडणूक झाली. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षिका महिला आघाडी, कास्ट्राईब संघटना, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक संघ, जिल्हा परिचर, लिपीक वर्ग कर्मचारी व सर्ववर्गीय कर्मचारी संघटना यांच्या पॅनल निवडणूकीत होते.
आमगाव गणाचे उमेदवार सुनेश गजानन कश्यप व महिला राखीव गटातून दिक्षा महादेव फुलझेले यांना उमेदवारी दिली होती. त्यात ते विजयी झाले.त्यांची विजयी रॅली पं.स. सालेकसा येथे काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, एल.यू. खोब्रागडे, संचालक एन.बी. बिसेन, जी.सी. बघेले, टी.आर. लिल्हारे, आर.जी. टेकाम, ओ.एच. लिल्हारे उपस्थित होते. संचालन शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सतीश दमाहे यांनी तर आभार एम.पी. माहुले यांनी मानले.
यशस्वितेकरिता एस.बी. दमाहे, टी.आर. लिल्हारे, जी.सी. बघे,े आर.एल. बसोने, ओ.एच. लिल्हारे, आर.जी. टेकाम, पी.एफ. ढेकवार, जयेश लिल्हारे, ए.बी. बोरकर, आर.सी. कोसरकर, प्रितम टेंभरे, सोनकनेकर, संतोष वैद्य,आर.के. बोरकर, गणवीर, वानखेडे, बैस, कुराहे, आर.जी. नागपुरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Co-operation Panel's Victory Rally