रेल्वे आरक्षण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:35 IST2018-02-03T23:34:44+5:302018-02-03T23:35:11+5:30
गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर असलेल्या डाक कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने रेल्वे आरक्षणासाठी सीएसआय प्रकारचे नवे सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू आहे.

रेल्वे आरक्षण केंद्र बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर असलेल्या डाक कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने रेल्वे आरक्षणासाठी सीएसआय प्रकारचे नवे सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून येथे सुरू आहे. मात्र यादरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांपासून हे रेल्वे आरक्षण केंद्र बंद असल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे.
गडचिरोली शहरासह लगतच्या परिसरातील अनेक नागरिक डाक कार्यालयातील या रेल्वे आरक्षण केंद्रात येऊन रेल्वे प्रवासाचे आरक्षण निश्चित करतात. मात्र या आरक्षण केंद्रातील काम बंद असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून अनेक नागरिक आल्या पावली परतले.
नागरिकांवर आर्थिक भूर्दंड
गडचिरोली शहरात रेल्वे प्रवासाचे आरक्षण करता यावे, यासाठी रेल्वे आरक्षण केंद्राची व्यवस्था करण्यात आली. मात्र येथे सॉफ्टवेअरचे काम सुरू असल्याने आरक्षण निश्चित करण्याचे काम बंद आहे. परिणामी अनेक नागरिक खासगी संगणक केंद्रात जाऊन आरक्षण निश्चित करीत आहेत. मात्र यासाठी त्यांना आर्थिक भूर्दंड पडत आहे.