रोजगार हमीची कामे बंद करा
By Admin | Updated: February 19, 2015 01:42 IST2015-02-19T01:42:09+5:302015-02-19T01:42:09+5:30
तालुक्यातील अनेक ठिकाणी उन्हाळी धानाची पेरणी करण्यात आली आहे. सध्या रोवणीचे काम सुरू असून त्यातच अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.

रोजगार हमीची कामे बंद करा
आरमोरी : तालुक्यातील अनेक ठिकाणी उन्हाळी धानाची पेरणी करण्यात आली आहे. सध्या रोवणीचे काम सुरू असून त्यातच अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. परिणामी धान रोवणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. यावर तोडगा म्हणून तालुक्यातील रोजगार हमीची सुरू असलेली कामे त्वरित बंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार दिलीप फुलसुंगे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
धान रोवणीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने अनेकांची रोवणी खोळंबली आहे. परिणामी शेतीची कामे ठप्प पडली आहेत. याचा परिणाम लागवडीवर झाला आहे. त्यामुळे रोहयोची कामे त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना पं. स. उपसभापती चंदू वडपल्लीवार, रघुनाथ मोगरकर, यशवंत लोणारे, पत्रू भांडेकर, काशिनाथ पोटफोडे उपस्थित होते.