गावातील अवैध दारूविक्री बंद करा

By Admin | Updated: September 20, 2014 23:51 IST2014-09-20T23:51:40+5:302014-09-20T23:51:40+5:30

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे तंमुस अध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तंटामुक्त गाव समितीची सभा गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर गाजली.

Close the illegal liquor shops in the village | गावातील अवैध दारूविक्री बंद करा

गावातील अवैध दारूविक्री बंद करा

कुनघाडा : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे तंमुस अध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तंटामुक्त गाव समितीची सभा गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर गाजली. यावेळी उपस्थित युवकांनी गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी लावून धरली.
१५ आॅगस्ट रोजी गठित करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सभेत विषयानुसार तीन तंट्यांचा निपटारा करण्यात आला. ४ तंटे शेती व घराच्या जागेविषयी असून चार तंट्याचे मोका चौकशी करण्याचे समितीच्या सभेमध्ये ठरविण्यात आले. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयानुसार तंमुसचे सदस्य सुधाकर वासेकर, उमेश गझलपल्लीवार, तेजस सातपुते, मंगेश वासेकर, प्रविण झोडे आदी सदस्यांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीचा मुद्दा उपस्थित केला.
बीट जमादार यांची बदली करण्यात यावी, दारू विक्रेत्यांना अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत नोटीस पाठविण्यात यावेत, दारूविक्री बंद न झाल्यास पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून अवैध दारूविक्री बंद करण्याचे ठरविण्यात आले. गावातील युवक वर्गांनीसुद्धा अवैध दारूविक्रीप्रती रोष व्यक्त करीत असल्यामुळे तंमुस पदाधिकाऱ्यांसमोर दारूबंदीचे आव्हान पेलण्याचे आवाहन केले. दारूबंदी मोहिमेत सहभाग दर्शविण्याची हमी दिली. तंटामुक्त समितीची सभा इतर विषय सोडून अवैध दारूविक्रीच्या मुद्यावर गाजली. सभेला सरपंच अल्का धोडरे, निमंत्रक दिलीप श्रृंगारपवार, भाऊजी कुकडे, अविनाश चलाख, उमेश कुकडे, बंडु वडेट्टीवार, संतोष गव्हारे, मंगेश वासेकर, सुधाकर वासेकर, तेजस सातपुते, शशीकला कोठारे, तलाठी भरडकर, उमेश गझलपल्लीवार तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Close the illegal liquor shops in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.