कोरचीतील अवैध धंदे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:56 IST2017-08-25T23:56:20+5:302017-08-25T23:56:37+5:30
कोरची तालुक्यात मटका, पत्ते, जुगार, दारूविक्री यासारखे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, ......

कोरचीतील अवैध धंदे बंद करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्यात मटका, पत्ते, जुगार, दारूविक्री यासारखे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी कोरची तालुका बहुजन समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
कोरची तालुक्यात मटका पत्त्याचे क्लब अनाधिकृतरित्या राजरोसपने सुरू आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. दिवसभर केलेल्या कामाची मजुरी मटक्यात खर्च केली जात आहे. पोलीस व इतर प्रशासनातील अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. यामुळे तालुक्यातील शांतता धोक्यात आली आहे. तहसीलदारांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून अवैध धद्यांवर प्रतिबंध घालावा, तशा प्रकारचे निर्देश पोलीस विभागाला द्यावे, अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर विधानसभा प्रमुख जयदेव सहारे, वामन राऊत, प्रशांत दोनाडकर, गौरधारी जांभुळे, विषयनाथ सहारे, प्रकाश ऊके, गोविंदा राऊत, रेखा हिडामी, सदाराम कोरटी आदींच्या स्वाक्षºया आहेत.