कोरची, मुरूमगाव भागात कडकडीत बंद
By Admin | Updated: July 29, 2016 01:10 IST2016-07-29T01:10:48+5:302016-07-29T01:10:48+5:30
नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत सुरू झाला आहे.

कोरची, मुरूमगाव भागात कडकडीत बंद
नक्षल सप्ताहाचा पहिला दिवस : एसटीचे ५० हजारांचे नुकसान
गडचिरोली : नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत सुरू झाला आहे. शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कोरची गावात व्यावसायिक प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. येथे नागरिकांना चहा व नास्ता मिळण्यासही मोठी अडचण झाली. हॉटेलसह अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असल्याने गैरसोय झाली.
धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. येथीलही व्यावसायिक प्रतिष्ठान बंद होती.
नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातून ३६ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये अहेरी, मुलचेरा, आसरअल्ली, विकासपल्ली, कसनसूर, कोटगूल, भामरागड आदी भागातील बसफेऱ्यांचा समावेश आहे. तसेच गोंदिया व निमगाव या बसफेऱ्यांचेही शेड्यूल रद्द करण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाचे पहिल्याच दिवशी ५० हजार रूपयांचे नुकसान यामध्ये झाले.