पोल्ट्रीफार्मचे बांधकाम बंद करा

By Admin | Updated: July 31, 2014 00:02 IST2014-07-31T00:02:47+5:302014-07-31T00:02:47+5:30

गाढवी नदीघाटावर सुरू असलेले अवैध पोल्ट्री फार्मचे बांधकाम त्वरित बंद करावे. सदर बांधकाम त्वरित बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेच्यावतीने तहसीलदार, ठाणेदार व ग्रामपंचायत

Close the construction of poultryfarm | पोल्ट्रीफार्मचे बांधकाम बंद करा

पोल्ट्रीफार्मचे बांधकाम बंद करा

तहसीलदार, ठाणेदारांना निवेदन : युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा
आरमोरी : गाढवी नदीघाटावर सुरू असलेले अवैध पोल्ट्री फार्मचे बांधकाम त्वरित बंद करावे. सदर बांधकाम त्वरित बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेच्यावतीने तहसीलदार, ठाणेदार व ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात मागील ३० ते ३५ वर्षापासून आरमोरी-गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीच्या तिरावर शिवशंकर, गणपती व पंचमुखी नागराजाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यात महाशिवात्रीला या ठिकाणी मोठी यात्राही भरते. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी नदी तिरावर येत असतात. या धार्मिक स्थळासमोर एका इसमाने पोल्ट्री फार्मचे अवैध बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. म्हणून पोल्ट्री फार्मचे अवैध बांधकाम त्वरित बंद करावे, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अमित बेहरे, उपजिल्हाप्रमुख सुरज हेमके, योगेश देवीकार, गणेश तिजारे, रवी गोंदोळे, शैलेश चिटमलवार, पराग धकाते, पंकज आखाडे, विनोद निकुरे, राकेश बोरकर, नितीन जोग, सौरभ चक्कनवार, आनंद कापकर, पराग बांते, पंकज नाकाडे, अक्षय चाचरकर, अमर गेडाम, ज्ञानेश्वर मैंद, गणवीर, अमित हेमके यांनी केली आहे.

Web Title: Close the construction of poultryfarm