साफसफाई करून कचऱ्याची होळी
By Admin | Updated: March 13, 2017 01:26 IST2017-03-13T01:26:14+5:302017-03-13T01:26:14+5:30
होळीच्या सणाचे औचित्य साधून गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सेमाना देवस्थान परिसरात

साफसफाई करून कचऱ्याची होळी
प्रेरणादायी उपक्रम : सेमाना देवस्थानात स्वच्छता अभियान
गडचिरोली : होळीच्या सणाचे औचित्य साधून गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सेमाना देवस्थान परिसरात रविवारी स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी गोळा झालेल्या कचऱ्याची होळी करण्यात आली. हा उपक्रम इतर नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
रविवारी सकाळी ७ वाजेपासून स्वच्छता मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी प्रामुख्याने घिसुलाल काबरा, दिलीप सारडा, रामायण खटी, गीता हिंगे, संदीप लांजेवार, प्रा. सुनिता साळवे, विकास वडेट्टीवार, विना जंबेवार, विनय मडावी, वैष्णवी डोंगरे, हर्षल गेडाम, सुभाष उप्पलवार, श्रीकांत डाऊ, सुरेश गुंडपवार यांच्यासह नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. सेमाना देवस्थानात येणाऱ्या भाविकांना सोयीचे व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली आहे. (नगर प्रतिनिधी)