शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गावांमधील स्वच्छतेचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:17 AM

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये स्वच्छता शाश्वत राहावी, यासाठी त्रयस्त संस्थेच्या मार्फत मंगळवारी काही निवडक १० ते १५ ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ठळक मुद्देमंगळवारपासून प्रत्यक्ष पाहणी : स्वच्छतेबाबत ग्रामीण भागातील नागरिकांची जाणणार मते

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये स्वच्छता शाश्वत राहावी, यासाठी त्रयस्त संस्थेच्या मार्फत मंगळवारी काही निवडक १० ते १५ ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. पाच लोकांची टीम सोमवारी सायंकाळी दाखल होणार आहे. सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.मार्च २०१८ पर्यंत राज्यातील २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. काही गावे हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. मात्र स्वच्छता ही केवळ पुरस्कारासाठी नसून चांगल्या व सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त घोषित झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायतींचे १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण करणारी टीम गावातील शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालये, त्यांचा वापर तपासणार आहे. बाजाराचे ठिकाण, धार्मिक स्थळे, चौक, गावठाण, परिसरातील सांडपाणी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन आदी बाबी तपासणार आहे. वरील स्थळांना भेट देऊन गावपातळीवरील प्रभावी व्यक्ती, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती जाणून घेणार आहे.स्वच्छता सेवा स्तराच्या प्रगतीच्या आधारे ३५ टक्के गुण दिले जातील. सार्वजनिक ठिकाणी पाण्याची उपलब्धता यावर ३० टक्के गुण व नागरिकांच्या मुलाखतीतून मिळणाºया माहितीच्या आधारे ३५ टक्के गुण दिले जाणार आहेत.राज्यातील ३४ जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची नमूना पद्धतीने निवड करून सर्वेक्षण होणार आहे.मंगळवारी सर्वेक्षण; प्रशासनाची तारांबळग्रामपंचायतींचे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत केले जाणार होते. गडचिरोली हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला मागास जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सर्वेक्षण करणारी समिती आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल, असा अंदाज बांधला होता. त्यादृष्टीने प्रशासन अगदी संथगतीने तयारी करीत होते. मात्र समिती सदस्य सोमवारी सायंकाळी गडचिरोली येथे दाखल होणार आहेत व मंगळवारपासून निवडक ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्या ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण केले जातील, याची माहिती समिती सदस्यांनाही नाही. मंगळवारी वेळेवर दिल्लीवरून निवडक गावांची यादी पाठविली जाईल, त्या गावांना समिती भेट देईल. एकंदरीतच निवडलेल्या गावांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहेत. ऐन वेळेवर समिती येणार असल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. काही ग्रामपंचायतींना याबाबतची माहिती सुद्धा नाही.असे राहील गुणांकणसर्वेक्षण करणारे समिती सदस्य गावातील स्वच्छतेची पाहणी करतील. त्याचबरोबर स्वच्छतेबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतली. एकूण १०० गुण राहणार आहेत. यामध्ये सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेला ३० टक्के गुण राहतील. यामध्ये शौचालय उपलब्धतता ५ गुण, शौचालय वापर ५ गुण, कचºयाचे व्यवस्थापन १० गुण, सांडपाणी व्यवस्थापन १० गुण राहतील. गावातील नागरिकांची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्राय यावर टक्के ३५ गुण आहेत. यामध्ये जाणीव जागृती २० गुण, नागरिकांचे आॅनलाईन अभिप्राय ५ गुण, प्रभावी व्यक्तींच्या अभिप्राय याला १० गुण राहतील. स्वच्छतेसंबंधी मानकांची जिल्ह्याने व राज्याने केलेल्या प्रगतीला ३५ टक्के गुण राहतील. यामध्ये स्वच्छतेचे प्रमाण ५ गुण, जिल्ह्याची हागणदारी मुक्तीची टक्केवारी ५ गुण, जिल्ह्याची हागणदारीमुक्त पडताळणी टक्केवारी १० गुण, फोटो अपलोडिंग ५ गुण व नादुरूस्त शौचालय उपलब्धता याला १० गुण दिले जाणार आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान