कठाणी नदीपात्रात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:51+5:30

ज्या नदीचे पाणी आपण पितो, त्याच नदीच्या पात्रात मृत व्यक्तींचा औषधी साठा, जैववैद्यकीय कचरा, कपडे, प्रेतावरील साहित्य तसेच प्लास्टिक, पुलावरून टाकण्यात येणारे घरगुती पुजेचे साहित्य, निर्माल्य, सॅनिटरी पॅड आदी कचरा कठाणी नदी पात्रात सर्रास टाकल्या जाते. त्यामुळे या भागात घाणीच्या साम्राज्यासह दुर्गंधी पसरत असते.

Cleanliness expedition in the Kathani river basin | कठाणी नदीपात्रात स्वच्छता मोहीम

कठाणी नदीपात्रात स्वच्छता मोहीम

Next
ठळक मुद्देआधार विश्व फाऊंडेशनचा पुढाकार : गाडगेबाबा जयंतीनिमित्त राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील आधार विश्व फाऊंडेशनच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसर व लगतच्या कठाणी नदी पात्रात रविवारी स्वच्छता मोहीम राबविली.
यावेळी आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, सचिव प्रा. सुनिता साळवे, कांचन चौधरी, विजया मने, शहनाज शेख, अरूंधती नाथानी, मिरा कोलते, स्नेहा आखाडे, धनश्री तुकदेव, सुनिता आलेवार, ऐश्वर्या लाकवडे, मंजू क्रिष्णापूरकर आदी उपस्थित होत्या. ज्या नदीचे पाणी आपण पितो, त्याच नदीच्या पात्रात मृत व्यक्तींचा औषधी साठा, जैववैद्यकीय कचरा, कपडे, प्रेतावरील साहित्य तसेच प्लास्टिक, पुलावरून टाकण्यात येणारे घरगुती पुजेचे साहित्य, निर्माल्य, सॅनिटरी पॅड आदी कचरा कठाणी नदी पात्रात सर्रास टाकल्या जाते. त्यामुळे या भागात घाणीच्या साम्राज्यासह दुर्गंधी पसरत असते. सूजाण नागरिकांनी आपल्या घराप्रमाणेच कठाणी नदी पात्र व मोक्षधाम परिसर स्वच्छ ठेवावा, हा संदेश देण्यासाठी विश्व फाऊंडेशनच्या महिलांनी हा उपक्रम राबविला. या संघटनेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

अंधश्रद्धेला दिला फाटा
विशेष म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी रविवारला अमावस्या होती. अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमी परिसराकडे महिला तर दूरच मात्र पुरूष मंडळीही फारसे फिरकत नाही. मात्र अंधश्रध्देला फाटा देत आधार विश्व फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी स्मशानभूती व कठाणी नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबविली. स्वत:च्या घरून रिकामी पोती आणून प्लास्टिकचा संपूर्ण कचरा न जाळता तो पोत्यात भरला आणि न.प.च्या स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केला. जाळण्यायोग्य कचऱ्याची आग लावून विल्हेवाट लावली.

Web Title: Cleanliness expedition in the Kathani river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.