स्वच्छता जनजागृती रॅली
By Admin | Updated: August 14, 2016 01:33 IST2016-08-14T01:33:34+5:302016-08-14T01:33:34+5:30
अहेरी येथील श्री शंकरराव बेझलवार कला, वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने १ ते १५ आॅगस्टपर्यंत

स्वच्छता जनजागृती रॅली
स्वच्छता जनजागृती रॅली : अहेरी येथील श्री शंकरराव बेझलवार कला, वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने
१ ते १५ आॅगस्टपर्यंत स्वच्छता जाणिवजागृती पंधरवडा राबविला जात आहे. या पंधरवडाच्या निमित्ताने शहर स्वच्छतेवर भर दिला जात आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याकरिता महाविद्यालयाच्या वतीने शहरात स्वच्छता जनजागृती रॅली नुकतीच काढण्यात आली. या रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. विविध घोषवाक्यातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.