सफाई कामगार कामबंद आंदोलनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:37 IST2019-04-14T22:36:43+5:302019-04-14T22:37:01+5:30
मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करावी, तसेच किमान वेतन कायद्याएवढी मजुरी द्यावी, या मुख्य दोन मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली नगर परिषदमधील सफाई कामगारांनी रविवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सफाई कामगार कामबंद आंदोलनावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करावी, तसेच किमान वेतन कायद्याएवढी मजुरी द्यावी, या मुख्य दोन मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली नगर परिषदमधील सफाई कामगारांनी रविवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कामगारांची मजुरी बँक खात्यात जमा करावी, तसेच किमान वेतनाएवढे मजुरी द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने मागील वर्षभरापासून लढा दिला जात आहे. गडचिरोली शहराची साफसफाई करण्याचे कंत्राट ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी श्री साई अभियंता संस्था चंद्रपूर या संस्थेला देण्यसात आले. मात्र या संस्थेकडून सफाई कामगारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जात आहे. रोहयो मजुराची मजुरी त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र शहरी भागात काम करणाऱ्या या मजुरांना रोकड स्वरूपात मजुरी दिली जाते. भविष्य निर्वाह निधी जमा करण्यास टाळाटाळ केली जाते. सफाई कामगारांना हॅन्डक्लोज, जोडे पुरविणे आवश्यक आहे. मात्र हे सुध्दा पुरविले जात नाही. एकंदरीतच संस्थेकडून कामगारांवर अन्याय केला जात आहे. याला अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने विरोध करून लढा उभारला आहे. नवीन आर्थिक वर्षापासून कामगारांची मजुरी त्यांच्या बँक खात्यातच जमा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारण्यात आले आहे.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. त्यानंतर आंदोलनाला सुरूवात केली. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन महातो, उपाध्यक्ष योगेश सोनवाने, सहसचिव सुभाष महानंदे, जिल्हा संघटक किशोर महातो, शहर अध्यक्ष लिना राणे यांनी केले. या आंदोलनात १५० कामगार सहभागी झाले.