क्लीनरने केला ट्रक चालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:33 IST2021-04-03T04:33:20+5:302021-04-03T04:33:20+5:30
राज एम. मारिया मायकल, रा. तामिळनाडू, असे मयत ड्रायव्हरचे नाव असून, माळस्वामी अब्बास मोतीराम काशीनाथमूर्ती (३९), रा. ओडिशा, असे ...

क्लीनरने केला ट्रक चालकाचा खून
राज एम. मारिया मायकल, रा. तामिळनाडू, असे मयत ड्रायव्हरचे नाव असून, माळस्वामी अब्बास मोतीराम काशीनाथमूर्ती (३९), रा. ओडिशा, असे आराेपी क्लीनरचे नाव आहे.
ट्रक (क्र. टीएन २८ एएल ४०८९) मोठी मशिनरी घेऊन तामिळनाडू येथून ओरिसाकडे जात होता; परंतु इंजिन निकामी झाल्याने आठ दिवसांपासून तो ट्रक घटनास्थळी रोडवरच उभा होता. ट्रकमध्ये ड्रायव्हर व क्लीनर दोघेच होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ट्रक चालक व क्लिनर यांच्यामध्ये पैशावरून भांडण झाले. भांडणादरम्यान राग अनावर झाल्याने क्लीनरने चालकाच्या छातीवर चाकूने वार केला. यात चालक ट्रकच्या केबिनमध्येच ठार झाला. घटनेची माहिती धानोरा पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी देशमुख, पोलीस शिपाई विनोद चुनारकर, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी क्लीनरला अटक करून पोलीस स्टेशनला आणून चौकशी सुरू आहे.