वळण रस्त्यावरील धोकादायक झुडूपे केली स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:42 IST2021-09-12T04:42:19+5:302021-09-12T04:42:19+5:30

कुरखेडा-कोरची या मुख्य मार्गावरील येरंडी वळणावर रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे उभे झाल्याने येथे वळण घेताना समोरील वाहन दिसत नसल्याने अपघाताचा ...

Clean up the dangerous bushes on the winding road | वळण रस्त्यावरील धोकादायक झुडूपे केली स्वच्छ

वळण रस्त्यावरील धोकादायक झुडूपे केली स्वच्छ

कुरखेडा-कोरची या मुख्य मार्गावरील येरंडी वळणावर रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे उभे झाल्याने येथे वळण घेताना समोरील वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. याकडे अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने धोक्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ही समस्या लक्षात घेत आदर्श युवा गणेश मंडळ येरंडी येथील सदस्यांनी श्रमदान करीत येथील झाडेझुडपे तोडत हा मार्ग मोकळा केला.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राहुल लोहबंरे, सचिव जितेंद्र हाते, सरपंच संतोष हिचामी, आशिष हिडको, बंटी तूलावी, विक्की मडावी, जयकांत हाते, राजू हिचामी, संदीप गोरठेकर सौरभ हिडको, शुभम जांभूळकर, शैलेश हलामी, योगेश लोहबंरे, अमोल नैताम, प्रफूल देसाई, बंटी शेंडे व मंडळाचे सभासद उपस्थित होते.

110921\img_20210911_142702.jpg~110921\img20210911115159.jpg

झाडे झूडपे स्वच्छ करताना गणेश मंडळाचे सभासद~स्वच्छता मोहीम राबविताना येरंडी येथील गणेश मंडळाचे सभासद

Web Title: Clean up the dangerous bushes on the winding road