कोरोना लढ्यासाठी रुग्णालयांचे वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:46+5:30

जिल्ह्यातील रुग्णालयांसोबतच संशयितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी विविध ठिकाणची शासकीय वसतिगृहे प्रशासनाने आधीच ताब्यात घेतली आहेत. रुग्णालयांसह त्या वसतिगृहांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात कोविड निगा केंद्र (सीसीसी), जिल्हा कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि जिल्हा कोविड रूग्णालय (डीसीएच) अशा तीन प्रकारच्या केंद्रांमधून उपचार आणि निगा राखली जाणार आहे.

Classification of hospitals for corona fighting | कोरोना लढ्यासाठी रुग्णालयांचे वर्गीकरण

कोरोना लढ्यासाठी रुग्णालयांचे वर्गीकरण

ठळक मुद्देविलगीकरणासाठी १३७५ बेड सज्ज : आरोग्य विभागाकडून संवर्गनिहाय रुग्ण व संशयितांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होत असताना अद्याप कोविड-१९ विषाणूची बाधा न झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात पुढील काळातही हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभाग नव्या जोमाने तयारीला लागला आहे. लगतचे जिल्हे किंवा राज्यातून कोणी संशयित रुग्ण जिल्ह्यात आलेच तर त्यांच्या विलगीकरणासाठी (क्वॉरंटाईन) आणि उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा रुग्ण आढळला तरी वेळीच त्याचा प्रसार थांबवण्यासाठी मदत होणार आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयांसोबतच संशयितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी विविध ठिकाणची शासकीय वसतिगृहे प्रशासनाने आधीच ताब्यात घेतली आहेत. रुग्णालयांसह त्या वसतिगृहांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात कोविड निगा केंद्र (सीसीसी), जिल्हा कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि जिल्हा कोविड रूग्णालय (डीसीएच) अशा तीन प्रकारच्या केंद्रांमधून उपचार आणि निगा राखली जाणार आहे.
मध्यम स्वरूपाचे गंभीर रु ग्ण उपजिल्हा रु ग्णालय आरमोरी व उपजिल्हा रु ग्णालय कुरखेडा तसेच नव्याने बांधकाम करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली ता.अहेरी येथे दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नॉन कोविड रुग्णालयांमध्ये जिल्हयातील सर्व उपकेंद्रे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच सर्व ग्रामिण रु ग्णालय व विभक्त केलेले उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी, कुरखेडा व उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांचा समावेश आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल रुग्णालय, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळयांचे रुग्णालय, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष तसेच रुग्णालयाच्या आवारातील धर्मशाळा यांचा नॉन कोविड रुग्णालयांमध्ये समावेश आहे. तिथे इतर आजारांवर उपचार होणार आहेत. नव्याने काही डॉक्टरांची भरती करण्यात आल्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना बळ मिळेल.

असे आहेत कोविड केअर सेंटर (सीसीसी)
एकलव्य विद्यालय मुलांचे वसतिगृह, अहेरी (१०० बेड), एकलव्य विद्यालय मुलींचे वसतिगृह अहेरी (१००), शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह वडसा (१००), शासकीय आदीवासी मुलांचे वसतिगृह कोरची (८५), शासकीय आदीवासी मुला-मुलींचे वसतिगृह बर्डी आरमोरी (१४०), शासकीय आदीवासी आश्रमशाळा मुलचेरा (५०), आदीवासी मुला-मुलींचे वसतिगृह चामोर्शी (१००), एसटी मुलांचे वसतिगृह कुरखेडा (१५०), आदीवासी मुलांचे वसतिगृह, धानोरा (१००), केजीबीव्ही मुलींचे वसतिगृह सिरोंचा (१००), शासकीय इंग्रजी आश्रमशाळा नवेगाव, गडचिरोली (१००), आरएमएसए वसतिगृह एटापल्ली (१००), कस्तुरबा बालिका शाळा भामरागड (१५०)

जिल्हा कोविड आरोग्य केंद्र
या रु ग्णालयमध्ये मध्यम स्वरु पाचे गंभीर रु ग्ण दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यात जी.एन.एम. प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली (१४० बेड), प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्ली (२० बेड), उपजिल्हा रु ग्णालय, आरमोरी येथील आंतररु ग्ण विभाग (२०), उपजिल्हा रु ग्णालय, कुरखेडा येथील आंतररु ग्ण विभाग (२०)

जिल्हास्तरावरील कोविड रु ग्णालये
जिल्हा सामान्य रु ग्णालय गडचिरोली येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०० खाटा तयार ठेवल्या आहेत. त्यासाठी या रुग्णालयात स्वतंत्र कोरोना वॉर्ड तयार केला आहे. तसेच गंभीर रुग्णांवर उपचारासाठी अतिदक्षता कक्ष असून काही बेडवर व्हेंटिलेटरचीही सोय आहे.

 

Web Title: Classification of hospitals for corona fighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.