रबी हंगामातील पिकावरील कीड रोगाचे शास्त्रीय निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 01:32 IST2016-01-31T01:32:33+5:302016-01-31T01:32:33+5:30

क्रॉप्साप प्रकल्प सन २०१५-१६ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने हरभरा व तूर पिकावरील किड रोगाच्या निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

Classical inspection of pests in rabi season | रबी हंगामातील पिकावरील कीड रोगाचे शास्त्रीय निरीक्षण

रबी हंगामातील पिकावरील कीड रोगाचे शास्त्रीय निरीक्षण

हरभरा व तूर पिकाची पाहणी : गुरवळा, मारोडा, हिरापूर भागात दौरा
गडचिरोली : क्रॉप्साप प्रकल्प सन २०१५-१६ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने हरभरा व तूर पिकावरील किड रोगाच्या निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोटक्के व प्रकल्प सनियंत्रक दिशेन पानसे यांनी शुक्रवारी गुरवळा, मारोडा, राखी, हिरापूर आदी भागात दौरा करून हरभरा व तूर पिकाची पाहणी केली. किड रोगाचे शास्त्रीय निरीक्षणही केले.
भात पिकानंतर रबी हंगामात गडचिरोली उपविभागात तूर व हरभरा पिकाकरिता क्रॉप्साप प्रकल्प कायम ठेवण्यात आला आहे. त्यानुसार एका सर्वेक्षक स्काऊटच्या मार्फतीने सर्वेक्षण व नियंत्रणाचे काम सुरू आहे. याशिवाय कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किड रोगावरील उपाययोजना सूचविल्या जात आहेत. गडचिरोली उपविभागाच्या क्षेत्रात किड रोगाबाबत निरीक्षण व सनियंत्रण सुरू असून मार्च २०१६ पर्यंत क्रॉप्साप या प्रकल्पाचा अहवाल पुस्तिकेसह पूर्ण करण्यात येईल, असे क्रॉप्साप प्रकल्पाचे सनियंत्रक दिनेश पानसे यांनी सांगितले.
यापूर्वी क्रॉप्साप प्रकल्पाअंतर्गत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धान पिकाची पाहणी करून रोगावर उपाययोजना सूचविल्या होत्या.

पिकांवर विविध रोगाचा आढळला प्रादुर्भाव
कृषी अधिकारी व प्रकल्प सनियंत्रकाच्या पाहणीत गुरवळा, मारोडा, राखी व हिरापूर भागातील हरभरा व तूर पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. हरभरा पिकावर घाटेअळी, देठ कुरतडणारी अळी, लष्कर अळी, कोरडी मर याचा प्रादुर्भाव दिसून आला. वातावरणातील लक्षणीय बदल, उशिरा पेरणी, अन्नद्रव्यांचा अपुरा व अयोग्य वापर यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.
हरभरा व तूर पिकावरील रोगाचे निर्मूलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक व दोन टक्के युरियाची फवारणी पिकांवर करावी, अशी उपाययोजना उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के यांनी शेतकऱ्यांना सूचविली.

Web Title: Classical inspection of pests in rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.