शहर स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:30+5:30

आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राऊत, संचालन राजू वडपल्लीवार तर आभार नगर परिषद अभियंता बंडावार यांनी मानले.

City cooperation requires the cooperation of all | शहर स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

शहर स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

ठळक मुद्देअरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : आरमोरी येथे घंटागाड्यांचे लोकार्पण; घरकूल लाभार्थ्यांना धनादेश वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.
आरमोरी नगर परिषदेला घंटागाड्या (टिप्पर) प्राप्त झाल्या आहेत. या घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. याचवेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतच्या लाभार्थ्यांना मिळालेल्या घरकुलाचा शुभारंभ व दिव्यांगांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अरविंद पोरेड्डीवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष पवन नारनवरे, नगर परिषद उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, आरोग्य सभापती भारत बावणथडे, पाणी पुरवठा सभापती विलास पारधी, महिला व बाल कल्याण सभापती सुनिता चांदेकर, नगरसेवक मिथून मडावी, नगरसेविका गीता सेलोकर, सुनिता मने, प्रगती नारनवरे, प्रशांत सोनकुंवर, माणिक भोयर, मुख्याधिकारी सचिन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे म्हणाले, नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर या नगर परिषदेच्या विकासासाठी सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध झाला आहे. आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राऊत, संचालन राजू वडपल्लीवार तर आभार नगर परिषद अभियंता बंडावार यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेखापाल संजय शेडगे, अनिता भडके, ज्ञानेश्वर दुमाने, योगेश दुमाने, प्रमोद कांबळे, अविनाश गाडवे यांनी सहकार्य केले.

आठ घंटागाड्या मिळाल्या
प्रत्येक घरी जाऊन कचऱ्याची उचल करून तो कचरा थेट डम्पिंग यार्डवर नेण्यासाठी शासनाने आरमोरी नगर परिषदेला ३६ लाख १६ हजार रुपये किमतीच्या आठ घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २३४ घरकूल बांधकामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. तसेच १२ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे २ हजार ११२ रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले.

Web Title: City cooperation requires the cooperation of all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.