वाढीव कराने नागरिक अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:00 AM2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:30+5:30

नगर परिषदेने जास्तीत जास्त कर वसुली करावी, असे निर्देश नगर विकास विभागाने तसेच शासनाने नगर परिषदेला दिले आहेत. त्यानुसार नगर परिषद प्रशासन कर वसुलीच्या कामाला लागले आहे. नागरिकांना कर वसुलीबाबतची माहिती व्हावी, यासाठी सध्या मागणी बिल वितरित करण्याचे काम सुरू आहे. मागणी बिलावर मालमत्ता कर, वृक्षकर, शिक्षण कर, रोजगारहमी कर, उपभोगता शुल्क , तसेच एकत्रीत बेरीज देण्यात आली आहे.

Citizens surprised by increased taxes | वाढीव कराने नागरिक अचंबित

वाढीव कराने नागरिक अचंबित

Next
ठळक मुद्देकर वसुलीला वेग : शासनाच्या निर्देशानुसार नगर परिषदेने केली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार नगर परिषदेने यावर्षी मालमत्ता कराच्या करयोग्य मूल्यावर तीन टक्के व उपभोगता शुल्कात सात टक्के वाढ केली आहे. त्यामुळे अनेकांचे घरटॅक्स मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. वाढलेले घरटॅक्स बघून नागरिक अचंबित होत आहेत.
नगर परिषदेने जास्तीत जास्त कर वसुली करावी, असे निर्देश नगर विकास विभागाने तसेच शासनाने नगर परिषदेला दिले आहेत. त्यानुसार नगर परिषद प्रशासन कर वसुलीच्या कामाला लागले आहे. नागरिकांना कर वसुलीबाबतची माहिती व्हावी, यासाठी सध्या मागणी बिल वितरित करण्याचे काम सुरू आहे. मागणी बिलावर मालमत्ता कर, वृक्षकर, शिक्षण कर, रोजगारहमी कर, उपभोगता शुल्क , तसेच एकत्रीत बेरीज देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येकाच्या करामध्ये वाढ झाली आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे वाढ झाली, याची माहिती नागरिकांना नसल्याने कशामुळे वाढ झाली, असा प्रश्न बिल वितरित करणाऱ्या व्यक्तीलाच करीत आहेत. तसेच काही नागरिक नगर परिषदेत येऊन विचारणा करीत आहेत. २०१८-१९ या वर्षात गडचिरोली नगर परिषदेच्या मालमत्ता कराची एकूण मागणी २ कोटी ३० लाख ६ हजार ३३१ रुपये होती. यावर्षी करवाढ झाल्याने ती ३ कोटी १४ लाख १७ हजार ८६३ वर पोहोचली आहे. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाल्यापासून नगर परिषदेने कर वसुली करण्याच्या कामाला गती दिली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचे नेमणूकही नगर परिषदेने केली आहे. १०० टक्के करवसुली करण्याच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासन कामाला लागले आहे.

पुढील वर्षी पुन्हा वाढणार कर
प्रत्येक चार वर्षानंतर कर आकारणीसाठी सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे. २०१६ मध्ये पुनर्सर्वेक्षण होणे आवश्यक होते, मात्र ते झाले नाही. मागील वर्षी एका खासगी कंपनीच्या मार्फत शहरातील घरांचा सर्वे केला जात होता. मात्र हे काम बंद पडले. त्यामुळे नगर परिषदेने पुढाकार घेऊन पुन्हा स्वत:च्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात केली आहे. आठ वर्षांच्या कालावधीत शेकडो नवीन घरे झाली आहेत. तसेच काहींनी जुन्या घराचा विस्तार केला आहे. विस्तारीत घराचे मोजमाप झाले नसल्याने यावर्षी जुन्याच मालमत्तेवर कर आकारले जाणार आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाची प्रक्रिया पुढील सहा महिन्यात पूर्ण होऊन वाढीव कर बसविला जाणार आहे. त्यामुळे करात वाढ होणार आहे.

कर वसुलीबाबत नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी नगर परिषदेमार्फत मागणी बिल वितरित केले जात आहेत. चांगल्या सेवा मिळण्यासाठी प्रत्येकाने कर भरणे आवश्यक आहे. काही सुज्ञ नागरिक मागणी बिल मिळताच कर भरत आहेत. मार्च महिन्याची प्रतीक्षा न करता, नागरिकांनी शक्य तेवढ्या लवकर कर भरून नगर परिषदेमार्फत होणारी कारवाई टाळावी.
- रवींद्र भंडारवार, कर अधीक्षक
नगर परिषद गडचिरोली

Web Title: Citizens surprised by increased taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.