विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:39 IST2021-08-23T04:39:47+5:302021-08-23T04:39:47+5:30

अहेरी: अहेरी तालुक्याच्या राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला असल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिमलगटा येथून गुडीगुडम व राजाराम परिसरात वीजपुरवठा ...

Citizens suffer from power outages | विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

अहेरी: अहेरी तालुक्याच्या राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला असल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिमलगटा येथून गुडीगुडम व राजाराम परिसरात वीजपुरवठा येथून केला जाते. गुडीगुडम ते जिमलगट्टा यामधील अंतर जवळपास ३० ते ३५ किमी आहे. जिमलगट्टा ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. त्या वीज उपकेंद्रामध्ये जिमलगट्टा, देचलीपेठा, उमानूर, मरपल्ली तसेच रेपनपल्ली, कमलापूर, राजाराम, गुडीगुडम असे तीन ते चार बाजूला वीजपुरवठा करावे लागते व सदर खूप मोठ्या क्षेत्रफळात व्यापला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या परिसराला वीजपुरवठा करणे शक्य नाही व शक्य होत नाही आहे. त्यामुळे वीज उपकेंद्रावर जास्तीच भार पडत आहे.

हलकासा पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. हलक्याशा वादळाने वीजपुरवठा तासन्तास खंडित होतो; पूर्वी कमलापूर परिसरात तीन ते चार वीज कर्मचारी (लाईनमन) राहत होते. त्यावेळी वीजग्राहक कमी होते. आता वीजग्राहक वाढले व वीज कर्मचारी (लाईनमन) कमी झाले. आता सद्य:स्थितीत एक स्थायी कर्मचारी व दोन रोजंदारी कर्मचारी आहेत. वीजपुरवठा घनदाट जंगलातून असल्याने कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब होत असतो. त्यामुळे वीजपुरवठा भूमिगत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Citizens suffer from power outages