शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा
By Admin | Updated: February 27, 2015 01:13 IST2015-02-27T01:13:21+5:302015-02-27T01:13:21+5:30
संपूर्ण राज्याच्या आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागात उजेडात आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी,

शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा
गडचिरोली : संपूर्ण राज्याच्या आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागात उजेडात आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सद्यस्थितीत सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार प्रकल्प अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी नेमल्याचे दिसून येत आहे. वास्तविक महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्याच्या चुकीमुळे व सहभागामुळे हा कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमून त्यांचीच चौकशी करणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य होणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचे पाळेमुळे उपटून काढण्यासाठी याप्रकरणाची सखोल चौकशी सीआयडी यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी डॉ. उसेंडी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.