किशोरवयीन मुलींच्या समस्येवर मंथन
By Admin | Updated: January 6, 2015 23:01 IST2015-01-06T23:01:49+5:302015-01-06T23:01:49+5:30
तालुक्यातील वासाळा येथील ग्रामस्थांच्यावतीने महिला मेळावा ३ जानेवारी रोजी घेण्यात आला. या मेळाव्यात महिला सबलीकरण, स्त्रीशिक्षण व किशोरवयीन मुलींच्या समस्येवर मान्यवरांच्या

किशोरवयीन मुलींच्या समस्येवर मंथन
आरमोरी : तालुक्यातील वासाळा येथील ग्रामस्थांच्यावतीने महिला मेळावा ३ जानेवारी रोजी घेण्यात आला. या मेळाव्यात महिला सबलीकरण, स्त्रीशिक्षण व किशोरवयीन मुलींच्या समस्येवर मान्यवरांच्या उपस्थितीत विचारमंथन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य कुसूम रणदिवे, आरमोरी पं. स. च्या सभापती सविता भोयर, पं. स. सदस्य सचिन महाजन, नानुजी चुधरी, भाग्यवान खोब्रागडे, वासाळाचे सरपंच रेखा वारके, रामदास जौंजाळकर, पडोळे, आनंदराव सोनटक्के, तुकाराम खोब्रागडे, भाऊराव रामटेके, देवाजी पाटील खेवले, सदानंद कुथे, रवींद्र बावनथडे आदी उपस्थित होते. यावेळी रांगोळी, भावगीत, चमचागोटी, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन विकास बोरकर, प्रास्ताविक अविनाश वऱ्हाडे, आभार प्रमोद सेलोकर यांनी मानले. (प्रतिनिधी)