गडचिरोलीतील खेड्यातल्या चुली पुन्हा पेटल्या; सिलेंडर आवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:38 IST2020-03-18T13:38:13+5:302020-03-18T13:38:42+5:30
चुलीच्या संपर्कात येऊन धुराचा त्रास महिलांना होऊ नये यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी गॅसजोडण्या मिळाल्या. मात्र सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे महिलांना पुन्हा चुलींकडे परतावे लागल्याचे चित्र आहे.

गडचिरोलीतील खेड्यातल्या चुली पुन्हा पेटल्या; सिलेंडर आवाक्याबाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: चुलीच्या संपर्कात येऊन धुराचा त्रास महिलांना होऊ नये यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी गॅसजोडण्या मिळाल्या. मात्र सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे महिलांना पुन्हा चुलींकडे परतावे लागल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील अनेक महिला सिलेंडरचा वापर फक्त चहा बनवण्यापुरता करीत असल्याचे दृश्य आहे. उज्ज्वला गॅस योजनेतून अनेक घरांमध्ये गॅस पोहचला होता. मात्र सिलेंडर लवकर न मिळणे आणि त्याच्या वाढत्या किंमती पाहता तो न वापरण्याकडे ग्रामस्थांचा कल राहिला. तशातच केरोसिनवरही बंदी आणल्याने महिलांना पुन्हा गोवऱ्या व सरपणाकडे वळावे लागले आहे. जंगल परिसरात राहणाºया कुटुंबांना तेथील वन्यपशूंचा नेहमीच धोका असतो. अशात सरपण गोळा करायला जंगलात गेल्यावर वन्यपशूच्या तावडीत सापडून ठार झालेल्या नागरिकांच्या अनेक कहाण्या येथे आहेत. सिलेंडरचे आकाशाला भिडणारे दर पाहता, घरचे बजेट सांभाळण्याकरिता महिला गोवºया व सरपणावरच अवलंबू राहू लागल्या आहेत.