क्षुल्लक वादातून तरुणाची चाकून भोसकून हत्या

By Admin | Updated: November 12, 2016 17:04 IST2016-11-12T17:04:57+5:302016-11-12T17:04:57+5:30

गडचिरोलीमध्ये क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.

Chuckle out with a trickle | क्षुल्लक वादातून तरुणाची चाकून भोसकून हत्या

क्षुल्लक वादातून तरुणाची चाकून भोसकून हत्या

 ऑनलाइन लोकमत

अहेरी गडचिरोली, दि. 12 - क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रावारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास छल्लेवाडा येथे ही घटना आहे. रस्त्यावर ठेवलेल्या बाईकवरुन वाद झाल्याने बैलगाडी वाल्याने हरिनाथ दुर्गे या 21 वर्षांच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर आरोपी सुधाकर दुर्गेने स्वतःहून रेपनपल्ली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. 
 
शुक्रवारी रात्री सुधाकर  दुर्गे व बसवय्या दुर्गे हे दोघे भाऊ छल्लेवाडा गावातील अंतर्गत रस्त्याने बैलगाडी घेऊन जात होते. यावेळी रस्त्याच्याकडेला हरिनाथ दुर्गे याची बाईक उभी होती. बैलगाडीमुळे बाईकचे नुकसान होईल, असे हरिनाथने म्हणताच दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.  
 
सुधाकर दुर्गे व  बसवय्या दुर्गे या दोघांनी मिळून  हरिनाथला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने सुधाकरने हरिनाथवर चाकूने वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेत हरिनाथच्या मदतीला गेलेला त्याचा भाऊ सुनीलदेखील गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी गडचिरोलीला हलवण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक धुरपडे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Chuckle out with a trickle