कारच्या धडकेत चितळ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST2021-01-08T05:59:11+5:302021-01-08T05:59:11+5:30

आष्टी : आष्टी-आलापल्ली मार्गावर चपराळा अभयारण्याच्या परिसरात भरधाव कारने चितळाला धडक दिली. या धडकेत चितळ जागीच ठार झाला. ही ...

Chital killed in car crash | कारच्या धडकेत चितळ ठार

कारच्या धडकेत चितळ ठार

आष्टी : आष्टी-आलापल्ली मार्गावर चपराळा अभयारण्याच्या परिसरात भरधाव कारने चितळाला धडक दिली. या धडकेत चितळ जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

वाहनचालक शिवायन शांतीरंजन बिश्वास रा. मुलचेरा यांच्या विराेधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कारची धडक एवढी जबर हाेती की, चितळ जागीच ठार झाला. तर वाहनाचा समाेरचा भाग क्षतिग्रस्त झाला. चितळाला धडक दिल्याची माहिती कळल्यानंतर मार्कंडा येथील वन्यजीव चेक नाक्यावर चारचाकी वाहन अडवून ताब्यात घेण्यात आले. चाैडमपल्लीचे प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी एम. जी. गाेवर्धन, वनरक्षक ए. एम. पाेतगंटावार यांनी मृत चितळाचा पंचनामा केला. आराेपी शिवायनला शुक्रवारी चामाेर्शी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

फाेटाे : ‌ठार झालेला चितळ.

Web Title: Chital killed in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.