गडचिरोलीच्या मार्केटची चिनी फटाक्यांना बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:03+5:30
अलिकडे काही वर्षांपासून फटाका मार्केटवर चिनी बनावटीच्या फटाक्यांचे वर्चस्व राहात आहे. काही चिनी बनावटीच्या फटाक्यांची लहान मुलांमध्ये क्रेझ आहे. परंतू यावर्षी विक्रेत्यांसाठी चिनी फटाक्यांप्रमाणेच आनंद देणारे भारतीय बनावटीचे फटाके उपलब्ध झाले. शिवाकाशी येथील मुख्य फटाका निर्मिती कारखान्यांमध्ये सर्व प्रकारचे फटाके तयार झाल्यामुळे विक्रेत्यांनीही चिनी फटाक्यांना बगल दिली.

गडचिरोलीच्या मार्केटची चिनी फटाक्यांना बगल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली : दिवाळी आणि फटाके हे समीकरण अविभाज्य आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी ही कल्पनाही आपण करू शकत नाही. यंदाच्या दिवाळीतही गडचिरोली शहरासह जिल्हाभरात फटाके फुटले. मात्र यावेळी शहरी भागात ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण करणाºया फटाक्यांच्या तुलनेत शोभेच्या फटाक्यांना लोकांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. प्रदुषणाबाबत लोकांमध्ये जागृती येत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अलिकडे काही वर्षांपासून फटाका मार्केटवर चिनी बनावटीच्या फटाक्यांचे वर्चस्व राहात आहे. काही चिनी बनावटीच्या फटाक्यांची लहान मुलांमध्ये क्रेझ आहे. परंतू यावर्षी विक्रेत्यांसाठी चिनी फटाक्यांप्रमाणेच आनंद देणारे भारतीय बनावटीचे फटाके उपलब्ध झाले. शिवाकाशी येथील मुख्य फटाका निर्मिती कारखान्यांमध्ये सर्व प्रकारचे फटाके तयार झाल्यामुळे विक्रेत्यांनीही चिनी फटाक्यांना बगल दिली.
यावर्षी सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्बसारख्या मोठ्या आवाज करणारे फटाके नागरिकांच्या पसंतीस उतरले नाही. याशिवाय सापाची गोळी, तिडतिडी, मोठ्या फटाक्यांच्या लळी, अनार यासारख्या जास्त धूर सोडणाºया फटाक्यांनाही ग्राहकांनी टाळले. त्याचवेळी आकाशात जाऊन मनमोहक आकारात फुटणाºया फटाक्यांना लोक जास्त पसंती देत असल्याचे फटाका व्यावसायिकांनी सांगितले.
गडचिरोली शहरात अनेक वर्षांपासून शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दिवाळीच्या काळात फटाक्यांची दुकाने लागतात. यावर्षीही या दुकानांनी दिवाळीची चाहुल लागताच फटाक्यांची दुकाने मांडली. पण शनिवारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाचा फटाका या व्यावसायिकांना बसला. ऐन फटाके विक्रीची सर्वाधिक विक्री होण्याच्या वेळीच विक्री ठप्प पडली होती. त्यातच पावसाच्या सर्दाव्यामुळे काही फटाके फुटले नाही. त्यामुळे ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली.
नियमांना डावलून विक्री
फटाके ज्वलनशील असल्यामुळे फटाके विक्रीचा परवाना देताना विविध प्रकारच्या अटी लावल्या जातात. त्या अटीनुसार सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही फटाक्याचे दुकान नागरी वस्तीत लावता येत नाही. मोकळ्या मैदानात ते असावे, दुकानात कापडाचा वापर करू नये. दुकानाच्या वर टिनाचे शेड असावे असे अनेक नियम आहेत. परंतू शहराच्या मूल मार्गावरील, नवेगाव भागातील काही विक्रेत्यांनी नियम डावलून चक्क नागरी वस्तीमधील घरात आणि रस्त्यालगत कापडी पडदे लावून दुकाने थाटली आहेत. एकीकडे शहरातील बहुतांश फटाका विक्रेते शिवाजी कॉलेजच्या मैदानात रितसर दुकाने लावत असताना नियमबाह्यपणे दुकाने लावणाºया त्या दुकानदारांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल विक्रेत्यांकडून केला जात आहे.