शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर, ब्रह्मपुरी, आमगावची भाजपलाच साथ

By admin | Updated: May 17, 2014 00:14 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात भाजप व महायुतीचे आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते यांना प्रचंड आघाडी मिळाली.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात भाजप व महायुतीचे आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते यांना प्रचंड आघाडी मिळाली.

ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात अशोक नेते यांना ८६ हजार ३५0, काँग्रेस आघाडीचे डॉ. नामदेवराव उसेंडी यांना ५६ हजार १८३, भाकपाचे उमेदवार प्रा. नामदेव कन्नाके यांना २ हजार ७३२, बसपाचे रामराव नन्नावरे यांना १३ हजार ७३६, आम आदमी पार्टीचे रमेशकुमार गजबे यांना १२ हजार ३१३, बहुजन मुक्ती पार्टीचे दिवाकर पेंदाम यांना ५६२, आंबेडकर राईट पार्टीचे देवराव नन्नावरे यांना ६९५, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अँड. प्रभाकर दडमल यांना ५१0, समाजवादी पार्टीचे विनोद नन्नावरे यांना ४५५, तृणमूल काँग्रेसचे सतीश पेंदाम यांना ६७१, अपक्ष बाबुराव दांडेकर यांना ६१७ मते मिळाली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात २ हजार ५६१ मतदारांनी नोटाचा वापर केला. चिमूर विधानसभा मतदार संघात अशोक नेते यांना ८0 हजार ३0९, डॉ. नामदेव उसेंडी यांना ५५ हजार २५७, नामदेव कन्नाके यांना २,८५२, रामराव नन्नावरे यांना १५ हजार ९0९, रमेशकुमार गजबे यांना २४ हजार २८५, दिवाकर पेंदाम यांना ६२६, देवराव नन्नावरे यांना ९८७, अँड. प्रभाकर दडमल यांना ४७७, विनोद नन्नावरे यांना ७४७, सतीश पेंदाम यांना ९0२, बाबुराव दांडेकर यांना ६७७ मते मिळाली आहे. या मतदार संघात २ हजार ४५१ मतदारांनी नोटाचा वापर केला. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार अशोक नेते यांना ३0 हजार १६७, चिमूर मतदार संघात २५ हजार ५२ मतांची आघाडी मिळाली आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव विधानसभा मतदार संघात भाजपचे अशोक नेते यांना २६ हजार ६२ मतांची आघाडी मिळाली आहे. आमगावमध्ये नेते यांना ८५ हजार ९१३, डॉ. उसेंडी यांना ५९ हजार ८५१ मते मिळालेले आहेत. या मतदार संघात बसपाचे रामराव नन्नावरे यांना ७,१७६, आम आदमी पार्टीचे डॉ. रमेश गजबे यांना १ हजार ७६९ मते मिळालेले आहेत. या मतदार संघात ३ हजार ९६ मतदारांनी नोटा मतदानाचा वापरही केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)