पुस्तकांशिवाय चिमुकल्यांचे शिक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST2021-07-11T04:25:07+5:302021-07-11T04:25:07+5:30
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माेफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. दरवर्षी विदर्भातील शाळा २६ जूनपासून ...

पुस्तकांशिवाय चिमुकल्यांचे शिक्षण सुरू
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माेफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. दरवर्षी विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू हाेत हाेत्या. पहिल्या दिवशी शाळांमध्ये स्वागत महाेत्सवाचे आयाेजन केले जात हाेते. या महाेत्सवादरम्यान विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात हाेते. तसेच पहिल्याच दिवशी त्यांना पाठ्यपुस्तके दिली जात हाेती. नवीन पाठ्यपुस्तक मिळाल्याने विद्यार्थी व पालक आनंदी हाेत हाेते. तसेच पहिल्याच दिवसापासून शिक्षणाला सुरुवात हाेत हाेती.
यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू हाेऊन आता १२ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही शाळांपर्यंत पुस्तके पाेहाेचली नाहीत. शाळा सुरू नसल्या तरी काही शाळांनी ऑनालाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, पुस्तकेच नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचण येत आहे.
बाॅक्स
सात तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाेहाेचली पुस्तके
चामाेर्शी, मुलचेरा, अहेरी, सिराेंचा, देसाईगंज, कुरखेडा, काेरची या तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तके पाेहाेचली आहेत. ही पुस्तके मुख्याध्यापकांनी घेऊन जायची आहेत. त्याला आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांना तर पुस्तकांचा पुरवठाच करण्यात आला नाही. पुस्तकांचा पुरवठा करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार हे अजूनही अनिश्चित आहे.
बाॅक्स
२० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर
प्रत्येक शाळेला केवळ ८० टक्केच पुस्तके पाठविली जाणार आहेत. २० टक्के पुस्तके जुनीच वापरायची आहेत. काही विद्यार्थी पुस्तके अतिशय चांगली ठेवतात. अशा विद्यार्थ्यांची पुस्तके पुन्हा वापरणे शक्य असते. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके चांगली ठेवायची सवय लागण्यास मदत हाेते.
बाॅक्स
वर्ग इयत्ता
पहिली १५,४०८
दुसरी १७,२६३
तिसरी १६,६५६
चौथी १६,८३८
पाचवी १६,१९६
सहावी १६,२५२
सातवी १६,९२४
आठवी १६,११७