बालिका विद्यालयाचा बेजबाबदार कारभार
By Admin | Updated: February 20, 2015 01:07 IST2015-02-20T01:07:30+5:302015-02-20T01:07:30+5:30
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ढासळल्यानंतरही तिला

बालिका विद्यालयाचा बेजबाबदार कारभार
भामरागड : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ढासळल्यानंतरही तिला उपचारासाठी नेण्यास गृहपाल किंवा मुख्याध्यापक शाळेत हजर नव्हते, असा प्रकार येथे उघडकीस आला आहे.
तालुक्यातील भामनपल्ली येथील दीक्षा जयराम झोडे या विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली, तेव्हा शाळेचा शिपाई व तीन विद्यार्थिनी तिला घेऊन ग्रामीण रूग्णालयात डॉ. वाहने यांच्याकडे आले. डॉ. वाहने यांनी तपासणी केली व ब्रेनमध्ये काहीतरी असल्याचे सांगून अहेरी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. परंतु हिच्यासोबत जबाबदार व्यक्ती पाठवा, असेही सांगितले. सकाळी ८ वाजतापासून ११ वाजेपर्यंत गृहपाल किंवा मुख्याध्यापिका कुणीही आले नाही. जबाबदार व्यक्तीशिवाय रूग्णवाहिका आपण नेऊ शकणार नाही, असे सांगितले. त्यानंतर पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी शिपाई मंथनवार यांना विद्यार्थिनीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या व त्यांना रूग्णवाहिकेत पाठविण्याची तयारी केली. तोपर्यंत मुलीचा भाऊच तिला उपचारासाठी घेऊन गेला होता. मुख्याध्यापिकेची प्रतिक्रिया घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधी शाळेत गेले असता, त्या सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.