चातगावनजीक वरातीचा ट्रक उलटला

By Admin | Updated: May 30, 2015 02:03 IST2015-05-30T02:03:11+5:302015-05-30T02:03:11+5:30

गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगावजवळ लग्नाची वरात घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले आहेत.

Chetagavaruk reverses the truck's sales | चातगावनजीक वरातीचा ट्रक उलटला

चातगावनजीक वरातीचा ट्रक उलटला

२२ वऱ्हाडी जखमी : जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू; एक गंभीर
धानोरा : गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगावजवळ लग्नाची वरात घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले आहेत. सदर अपघात गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. सर्व जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जखमींमध्ये देवेंद्र मडावी (२५), विलास सहारे (३४), दिनकर दिघोरे (४०), साधू मडावी (५५), विठ्ठल घोडाम (५०), तान्हू कुमरे (६५), सीताबाई कोरेटे (६२), ओमप्रकाश मडावी (३०), बुधाजी कोल्हे (६५), मिथून कोल्हे (२९), मुकेश चिकराम (३५), पुंडलिक मडावी (२३), मनोहर कोडापे (५५) सर्व रा. मालदुगी माणिक ताडाम (४५), सुनील हलामी (२०), पंकेश ताडाम (१८), दिनकर ताडाम (२२), शामराव तुलावी (४२) अशी जखमींचे नावे आहेत. कुकसूबाई कोल्हे (६५) ही गंभीररीत्या जखमी झाली आहे.
कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन लगामबोरीकडे सदर ट्रक जात होता. चातगावजवळच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला. यामध्ये वऱ्हाडी जखमी झाले. ट्रक पलटल्याची माहिती मिळताच चातगाव येथील नागरिक, पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. त्यांना पाणी पाजून एका वाहनात बसवून त्यांची तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले. घटनेच्या वेळी रोहित वैरागड हा ट्रक चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. यातील काही जखमींची शुक्रवारी रूग्णालयातून सुट्टी झाली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Chetagavaruk reverses the truck's sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.