बुद्धीबळ स्पर्धेतून जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना मिळेल!

By Admin | Updated: March 7, 2017 00:48 IST2017-03-07T00:48:01+5:302017-03-07T00:48:01+5:30

गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करणे हे जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना देणारी बाब आहे.

Chess competition will boost the sports development of the district! | बुद्धीबळ स्पर्धेतून जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना मिळेल!

बुद्धीबळ स्पर्धेतून जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना मिळेल!

विजेत्यांना पारितोषिक प्रदान : प्रंचित पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन; २०० स्पर्धकांनी घेतला सहभाग
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करणे हे जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना देणारी बाब आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन दरवर्षी होत राहिले तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व जागतिक पातळीवर गडचिरोली जिल्ह्याचे नावलौकीक होईल, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुध्दीबळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, डॉ. प्रशांत चलाख, बुध्दीबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष अमित सुचक आदी मान्यवर उपस्थित होते. बुध्दीबळसारख्या स्पर्धा आयोजित करून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे, असे सांगत बुध्दीबळ खेळाची सुरूवात कशी झाली व त्यात परदेशात बदल कसा झाला, याबाबत पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले. सदर बुध्दीबळ स्पर्धेत एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुध्दीबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, सचिव हेमप्रकाश बारसागडे, सहसचिव राजू सोरते, सदस्य पी. डब्ल्यू भुरसे, जी. के. नरड, एस. एम. अलमपटलावार, सी. एम. तोटावार, ए. के. पत्रे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष तथा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले तर संचालन व आभार किरण सांबरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला बँकेचे कर्मचारी, बुध्दीबळ स्पर्धेतील सहभागी खेळाडू व जिल्ह्यातील बुध्दीबळ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

हे आहेत बुद्धीबळ स्पर्धेचे विजेते
सदर बुध्दीबळ स्पर्धेत खुल्या गटातून अजयकुमार सिंग प्रथम, रोशन कोंडावार द्वितीय तर उमेश सहारे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. हायस्कूल गटातून दीप जुवारे प्रथम, सुयोग होनमाने, निशाद खोब्रागडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मिडल स्कूल गटातून श्रीरंग गौरकार प्रथम, सारंग उरकुडे द्वितीय, प्रविण श्रीरामे तृतीय तसेच प्रायमरी गटातून हर्ष सूचक प्रथम, वेद चलाख द्वितीय, ओजस रासेकर याने तृतीय क्रमांक पटकाविला. बेस्ट वुमन म्हणून कुमोदिनी बारसागडे यांची निवड करण्यात आली. बेस्ट ब्रिलीयंट किड्स अ‍ॅकॅडमी पॅरेंट्स पुरस्काराचे मानकरी डॉ. प्रशांत चलाख ठरले.
गडचिरोली स्पेशलच्या खुल्या गटातून व्यंकटस्वामी वेनमपल्ली प्रथम, अजय निंबाळकर द्वितीय, ज्ञानेश्वर वर्धेकर तृतीय, भाग्यश्री भांडेकर चौथी तर वैशाली पुणेकर पाचव्या क्रमांकावर राहिली. हायस्कूल गटातून साईल हनवते प्रथम, ईशान्य कुकडे द्वितीय, सिध्देश भरडकर तृतीय, अखिलेश धाईत चतुर्थ, ओम नागापुरे पाचव्या, अंश तोटावार सहाव्या आणि क्रिश श्रुंगारपवार सातव्या क्रमांकावर राहिला. हायस्कूल गटातून ओम टेप्पलवार प्रथम, विप्लव इटनकर द्वितीय, साईल देवाडे तृतीय, आदित्य बोदलवार चतुर्थ तसेच आयुष वंजारी, क्षितीज नेरकर व ध्रुव शर्मा हे अनुक्रमे पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर राहिले. प्रायमरी गटातून यश चिचघरे प्रथम, क्रिष्णा पोगुलवार द्वितीय, तन्मय पत्रे तृतीय, विराज ठाकरे चतुर्थ तर कुणाल गोवर्धन, प्राची श्रीपदवार व चिन्मय खरवडे हे तिघेजण अनुक्रमे पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकाचे विजेते ठरले.

Web Title: Chess competition will boost the sports development of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.