चेरपल्ली प्रभाग अनेक समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:51 IST2016-06-13T02:51:01+5:302016-06-13T02:51:01+5:30
स्थानिक नगर पंचायतींतर्गत चेरपल्ली प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध मूलभूत समस्या निर्माण झाल्या असल्याने येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

चेरपल्ली प्रभाग अनेक समस्यांच्या विळख्यात
नागरिक प्रचंड त्रस्त : अहेरी नगर पंचायतीचे दुर्लक्ष
अहेरी : स्थानिक नगर पंचायतींतर्गत चेरपल्ली प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध मूलभूत समस्या निर्माण झाल्या असल्याने येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे अहेरी नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
चेरपल्ली प्रभाग क्रमांक १६ मध्ये असलेल्या सार्वजनिक विहिरीची पूर्णत: दुरवस्था झालेली आहे. या भागातील नागरिक या विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात आणखी या ठिकाणी दुर्गंधी वाढण्याची शक्यता आहे. अहेरी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व प्रभागातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. मात्र चेरपल्ली भागातील एकाही नालीची स्वच्छता करण्यात आली नाही. या प्रभागातील सर्व नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडूंब भरल्या आहे. या नाल्यांची स्वच्छता न झाल्यास पावसाळ्यात पाणी लगतच्या घरांमध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)